Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सध्या चर्चा सुरु आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसैनिकांचं राज्यात अनेक ठिकाणी मनोमिलन होत...More
Anc: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बीडच्या मसाजोग गावात प्रताप सरनाईक यांनी वैभवी देशमुख धनंजय देशमुख आणि समस्त ग्रामस्थांची ही भेट घेतली आहे. यादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला अभ्यासासाठी सरनाईक यांनी लॅपटॉप भेट दिला. तर पुढील शिक्षणाचा देखील खर्च सरनाईक करणार आहेत.. दरम्यान मंत्री सरनाईक यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती धनंजय देशमुख यांच्याकडून जाणून घेतली.
गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.
या दु:खद घटनेनंतर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री श्री. @CRPaatil आणि राज्याचे आरोग्यमंत्री श्री. @irushikeshpatel यांच्याशी संपर्क साधून आरोग्य सेवा आणि मदतकार्याची माहिती घेतली आहे.
मी भाजपमधील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्यात सहभागी व्हावे आणि पीडित कुटुंबांना शक्य तेवढी मदत करावी.
ईश्वर शोकाकुल कुटुंबियांना ही असह्य वेदना सहन करण्याची ताकद देओ आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शक्ती देवो, हीच प्रार्थना.
गुजरातहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI 171 हे विमान अहमदाबाद च्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात क्रॅश झाले . तब्बल 700 फुटांवरून हे विमान कोसळलं आहे .अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या ५ मिनिटांत एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात १६९ भारतीय होते. याशिवाय ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन, १ पोर्तुगीज प्रवासी होते.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहारच्या महिलांचं रास्तारोको सुरू
मोठ्या प्रमाणावर महामार्गावर वाहतूक कोंडी
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस
सरकार कडून अद्यापही उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहार आक्रमक
बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन सह 17 मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहे...
बच्चू कडू यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे तर दुसरीकडे त्यांची तबीयत खालावत चालली आहे...
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना (plane crash) घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात प्रवासी विमान (passenger aircraft) कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं (Air India) हे विमान असल्याचे समजते. विमानत अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये शेकडो वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब कोसळले तर अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेले. बावी येथील वनवे आणि इंगोले यांच्या घरावरील पत्रे या वादळी वाऱ्याने उडून गेल्याने दोन्ही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला घरातील संसार उपयोगी साहित्यासह साठवलेले अन्नधान्य देखील पावसात भिजले असून या कुटुंबांसमोर मोठी अडचण उभा राहिली आहे. प्रशासनाने पंचनामे करत तातडीने मदत द्यावी अशी मागणी कुटुंबांकडून होत आहे.
एसटी सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेचा गैरवापर करत, मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवणाऱ्या बेशिस्त एसटी चालकावर वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात बुधवारी रात्री ही घडली.
हेमंत मेश्राम नावाचा एसटी चालक रिकामी बस घेऊन विठ्ठलवाडी डेपोकडे निघाला होता. नेतीवली परिसरात त्याने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातानंतर रिक्षाचालक व मेश्राम यांच्यात वाद सुरू झाला .वादाच्या दरम्यान कोळशेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना एसटी चालकावर मद्यप्राशनाचा संशय आल्याने त्यांची अल्कोहोल तपासणी करण्यात आली. तपासणीत मेश्राम दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.वाहतूक पोलिसांनी तात्काळ ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत कठोर कारवाई करत एसटी जप्त केली व चालकावर १०,००० रुपयांचा दंड ठोठावला. सुदैवाने या एसटीमध्ये प्रवासी नव्हते ही रिकामी एसटी घेऊन चालक विठ्ठलवाडी डेपोच्या दिशेने जात होता.या प्रकारामुळे एसटीसारखी महत्त्वाची सेवा धोक्यात घालणाऱ्या दारुड्या चालकांविरोधात कठोर कारवाई करावी ,अशी मागणी केली जात आहेत .
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं. रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची माहिती आहे.
बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार...
बच्चू कडू यांच्या मागण्या संदर्भात तोडगा निघणार का याकडे लक्ष ?
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगाना प्रति माह 6 हजार रुपये मानधन यासह 17 मागण्या संदर्भात बच्चू कडूंच सुरू आहे गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग उपोषण....
पुणे: शादी डॉट कॉम वेबसाईटवरून मुलीशी संपर्क साधून लग्नाच अमिश दाखवून महिलेची ३ करोड १६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या महिलेकडून ८१ बँक खात्यावर पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली तरुणी शादी डॉट कॉम संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती. तेव्हा पाहिजे आरोपीची आणि तिची ओळख झाली. परदेशात नामांकित कंपनीत सीईओ असल्याचं सांगितलं. फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाचा देखील विश्वास बसला. त्यांचं व्हाट्सअप कॉल वरून दररोज बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं होतं, त्यामुळेच याचा फायदा आरोपीने घेतला. आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्ज फेडीचे कारणे देऊन २०२३ ते २०२४ दरम्यान उच्चशिक्षित तरुणीकडून तब्बल ३ करोड १६ लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल. हे करोडो रुपये आरोपीने वेगवेगळ्या ८१ बँक खात्यावर घेतले होते. पैकी, ११ अकाउंट हे एकाच पत्त्यावर होते. पैकी हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले, त्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात होते असं पोलीस तापासात समोर आला आहे. तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजीत, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉल च्या माध्यमातून संपर्कात होते. बबलू हा अज्ञात आरोपीच्या सांगण्यावरून एटीएम मधून पैसे काढून त्याला द्यायचा. या प्रकरणात आत्तापर्यंत ३०० ते ४०० बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे.
बीड: बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केलं. नुकसानग्रस्त भागांची आमदार सुरेश धस यांनी पाहणी केली. बीड अहिल्यानगर महामार्गावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहे. परिणामी कालपासून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमदार धस यांनी घेतला. यावेळी महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.. दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन धस यांनी केले.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत प्रहार कार्यकर्ते संतप्त..
धामणगाव शहरातील मुख्य असलेल्या शास्त्री चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत चक्काजाम केला..
यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली..
सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, दिव्यांगांना सहा हजार मानधन देण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या..
बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला...
खामगाव चे माजी आमदार दिलीप सानंदा यांचा काँग्रेसला रामराम.
आज करणार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश.
मी काँग्रेस सोडलेली नाही,फक्त भारतीय च्या जागी राष्ट्रवादी केल आहे. माजी आमदार दिलीप सानंदा यांचा अजब तर्क.
बुलढाण्यातील खामगाव चे तीन वेळा काँग्रेसकडून आमदार राहिलेले राना दिलीप सानंदा हे आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करत आहे आज खामगाव येथे राष्ट्रवादीच्या संकल्प मेळाव्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होत आहे.
सत्तेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही अनेक कार्यकर्ते विड्यानपिढ्या न्यायापासून वंचित राहतात कार्यकर्त्यांना न्याय मिळावा त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला
मी काँग्रेस सोडली नाही फक्त भारतीय च्या जागी राष्ट्रवादी केलं आहे दोघांच्या विचारसरणी सारख्या आहेत.
आम्ही महायुती म्हणूनही आगामी निवडणुकीत झेंडा फडकवू किंवा स्वतंत्र म्हणूनही झेंडा फडकवू
कोल्हापूर शहरात एका कुटुंबांने नियमबाह्यपणे पाळलेली मांजरे जप्त करण्यात आली आहेत. रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरी असलेल्या मांजरांवर ही कारवाई झाली. कारवाईवेळी एका मांजराने मनपा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा देखील घेतला. मांजरांना खाऊ घातलेले पदार्थ आणि इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी त्रस्त होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये तीन मांजरे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेच आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.
कोल्हापूर शहरात एका कुटुंबांने नियमबाह्यपणे पाळलेली मांजरे जप्त करण्यात आली आहेत. रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरी असलेल्या मांजरांवर ही कारवाई झाली. कारवाईवेळी एका मांजराने मनपा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा देखील घेतला. मांजरांना खाऊ घातलेले पदार्थ आणि इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी त्रस्त होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये तीन मांजरे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेच आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात..
चक्काजाम आंदोलनादरम्यान अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात,
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मधील बाबा पेट्रोल पंप चौकात गेल्या अर्धा तासापेक्षा अधिक काळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं
शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,युगंधर पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बैठक
बारामती मधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात माळेगाव च्या निवडणुकीत बळीराजा पॅनल तर्फे अर्ज भरण्यात आले आहेत
या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनेल बरोबर युती करायची की?अण्णा तावरे यांच्या पॅनल बरोबर युती करायची यासंदर्भात बैठक थोड्याच वेळापूर्वी पार पडली
थोड्याच वेळात सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यासंदर्भात निर्णय घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोघांचीही भेट
ताज लॅंड एन्डमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही नेत्यांची भेट
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा होत असताना दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व
Akola: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यात दाखल झाले आहे.. अकोला शिवणी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.. अकोला आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठकीसाठी अजित पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झाले आहे.. थोड्याच वेळात अजित पवार आढावा बैठकीला सुरुवात करणार आहे.. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरीसह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत..
त्यानंतर 12 वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडणार आहे.. पत्र परिषद आटोपल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट असणार.. त्यानंतर अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे.. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे....
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप २०२४ मध्ये झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते त्याबाबतची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली मात्र उर्वरित विमा अद्याप मिळाला नाही त्यातच पिक विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी केलेले अर्ज नाकारले त्यात सोनपेठ तालुक्यातील ७ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारीचा समावेश आहे याच तक्रारींचे गठ्ठे घेवून आज शेतकरी आणि शेतकरी नेते थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन कृषी अधिकाऱ्यांना दिले तसेच ह्या तक्रारी का नाकारण्यात आल्या याचा जाब ही विचारला जर येत्या ३ दिवसात जर याबाबत कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपनीने निर्णय नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस धारा सुरू
मशागतीनंतर भात पेरणीसाठी बळीराजाची लगभग
आज पासून पुढचे चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट
मुंब्रा रेल्वेस्थानाकातील दुर्घटने नंतर पश्चिम रेल्वे वरील प्रवास ही जीवघेणा झाला आहे. वैतरणा ते मिररोड रेल्वे स्थानकादरम्यान मागच्या दीड वर्षात 284 जणांचा बळी गेले आहेत. तर 286 प्रवासी लोकलमधून पडून जखमी झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली आहे. 284 मृत्यू झालेल्या पैकी 171 जणांचा मृत्यू हा लोकलच्या धडकेत, 61 जणांचा लोकल मधून तोल जाऊन पडून मृत्यू झाला आहे. तर 52 जणांचा इतर कारणामुळे मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे आहे. 286 रेल्वे प्रवासी जखमी पैकी 180 रेल्वे प्रवासी हे धावत्या लोकलमधून पडून जखमी झाले आहेत. मिररोड ते वैतरणा अशी 31 किलोमीटर रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द असून, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरारोड, वसई, नालासोपारा, विरार, नायगाव, वैतरणा ही रेल्वे स्थानकांचा समावेश असून, दिवसाला 12 ते 15 लाख प्रवासी लोकल ने प्रवास करतात.
शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये होणार 'प्रवेशोत्सव'
सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी करणार आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत
शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जूनला 'प्रवेशोत्सव' उपक्रमाचे आयोजन
आदिवासी विकास मंत्र्यांचे सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन
आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रमात सामील होण्याचे आवाहन
तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबल च्या मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या
तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत राहत्या घरी केली आत्महात्या, सारिका शिकारे असे आत्महात्या केलेल्या मुलीचे नाव
माझ्यावर प्रेम कर , लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेल आरोपीने अशी धमकी दिल्याने पंधरा वर्षीय मुलीने घेतला टोकाचा निर्णय.
आरोपीने मुलीला दिली होती बंदुकीने मारण्याची धमकी
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल
सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पुर्वीचाही गुन्हा आहे दाखल.
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ दक्ष
विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात
मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर
पुढच्या दोन महिन्यात मुंबईत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मतदारांना घालणार साद
मुंबईतील हिंदू मतांसाठी संघ करणार मुंबईत प्रयत्न
लवकरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ करणार सर्व्हे
सातारा: फलटण तालुक्यात ठाकूर की येथे रस्त्यालगत एकाचा जमिनीमध्ये पुरलेले अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे... संदीप मनोहर रिते असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी केले असता मृतदेहाच्या गळ्यावर डोक्यात गंभीर जखमा आढळून आले असल्यामुळे हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत... या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
मनसेच्या नावाखाली मुंबईतील मोबाईल कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा व्हिडिओ समोर
आता आलोय हात जोडून नंतर येईन नंतर येईन हात सोडून व्हिडिओत उल्लेख...
व्हिडिओनंतर मुंबईतील मोबाईल कंपन्यांना महाराष्ट्र नवनिर्माण दुरसंचार सेनेचे पत्र...
संघटनेच्या नावाखाली काही तोतया व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण दूरसंचार सेनेच्या नावाचा गैरवापर करून कंपन्या आणि व्यक्तींकडून पैसे उकळत आहेत
या लोकांचा आमच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही आणि ते खोट्या बतावणीखाली बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतले आहेत
महाराष्ट्र नवनिर्माण दूरसंचार सेनेचा अध्यक्ष म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो की अशा फसव्या वर्तनाला बळी पडू नका. तुम्हाला असा कोणताही प्रकार आढळल्यास, कृपया तात्काळ योग्य कायदेशीर अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करा महाराष्ट्र नवनिर्माण दुरसंचार सेनेचं आवाहन
बीड: भर दिवसा घरातून दहा लाख 50 हजार रुपयांचे सोने लंपास करणाऱ्या मोलकरणीला बीड पोलिसांनी 48 तासात अटक केलीय. बीड शहरातील डॉक्टर लक्ष्मीकांत आंधळे घरातून बाहेर गेले असता मोलकरीण महिलेने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी खाक्या दाखवताच महिलेने चोरीची कबुली दिली. लालसेपोटी मोलकरणीने हे कृत्य केल्याचे सांगितले..
शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झाली असून मराठवाड्याच्या वेशीवर या पालखीचे स्वागत हिंगोलीकरांच्या वतीने करण्यात आला आहे. पांढरे कपडे परिधान करून हातामध्ये भगवी पताका घेत शिस्तीत चालणारे वारकरी हे या पालखीचं वेगळं पण असतं. पुढील तीन दिवस ही पालखी हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुक्कामी असणार असून या पालखीमध्ये सातशे वारकरी सहभागी झाले असून 33 दिवसांचा पायी प्रवास करून हे वारकरी सहा जून रोजी पंढरपूर येथे आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पोहोचणार आहेत.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहारचं रास्तारोको सुरू
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस
सरकार कडून अद्यापही उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहार आक्रमक
बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन सह 17 मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहे...
बच्चू कडू यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे तर दुसरीकडे त्यांची तबीयत खालावत चालली आहे...
विदर्भात आज अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.. हवामान विभागाचा दमदार पावसाचा अंदाज..
- महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचे आगमन मे महिन्याच्या शेवटी झाले असले तरी विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अद्याप मान्सून सक्रिय झाला नाही..
- आज मात्र विदर्भात नागपूर, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे...
महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच?
महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेची सात टप्प्यातील प्रक्रिया पार करण्याकरिता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता
प्रभागांची रचना करण्याचा अधिकार सरकारकडे असून नगरविकास विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागांची रचना करण्याचा आदेश
प्रभाग रचनांची प्रक्रिया सप्टेंबरच्या सुरुवातीस पूर्ण होण्याची दाट शक्यता
प्रभाग रचने सोबतच आरक्षण आणि मतदार यादी अद्यावत करणे यासाठी सुद्धा उशीर लागणार आहे
सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच निवडणुका पार पडण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्यता
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगर सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील काही भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू . महानगरपालिकेकडून कॉन्ट्रॅक्टर विरोधात तक्रार.. कॉन्ट्रॅक्टर पाटील सह पाच जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल.. उद्यान पुढील सात दिवस बंद राहणार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेले काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी त्यांच्या निवडणूक निकाला विरोधातल्या याचिके संदर्भात उच्च न्यायालयात लेखी युक्तिवाद करण्याची परवानगी मागितली आहे...
* प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विदर्भातील वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
- त्याच प्रकरणात प्रफुल गुळधे यांनी आता न्यायालयाला लेखी स्वरूपात युक्तिवाद करण्याची परवानगी मागितली आहे...
- नागपूर खंडपीठाने लेखी युक्तीवाद करण्यासाठी 16 जून पर्यंतचा वेळ दिला आहे..
गिरगाव आणि दादर परिसरात रात्रीतून पुन्हा लागले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या काका पुतण्यांचे एकत्रित फोटो असलेले वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर
"महाराष्ट्र व खासकरून मुंबई मराठी माणसाची होती आहे आणि यापुढे राहील" "नवे युग नवे पर्व "असं म्हणत दोन्हीही नेत्यांना वाढदिवसानिमित्त बॅनर लावून ठाकरे प्रेमी परेश तेलंग यांनी शुभेच्छा दिल्या
१३ जूनला आदित्य ठाकरे आणि 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे... त्यामुळे दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देताना चे एकत्रित फोटो असलेले बॅनर युवासेना आणि ठाकरें प्रेमींकडून लावलेले पाहायला मिळत आहेत..
यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे यवतमाळ, आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी, कळंब, वणी, नेर या 9 तालुक्यात नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. या तालुक्यात 1815 घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली. एकाच मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाले. 57 जनावरांच्या मृत्यू तर 162 हेक्टर वरील केली, संत्रा, लिंबू, पपई, तीळ, ज्वारी फळबाग इतर पिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही ठिकाणी विद्युत पोल खाली पडले. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा अजूनही सुरळीत झाला नाही. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे अशे निर्देश दिले.
आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये या पावसाने हजेरी लावली आहे. काही तास जोरदार बरसल्यानंतर रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान शेतकरी सुद्धा आता पेरणीसाठी अशाच पद्धतीच्या मोठ्या पावसाची वाट पाहू लागले आहेत. जोरदार झालेल्या या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला होता.
स्वबळावर लढलं पाहिजे, स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर, मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्यांच स्पष्ट
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर