- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटकBaba Siddiqui Death Case : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी (Baba...More
saolapur : भाजपचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांचा पक्षाला घरचा आहेर .. विधानसभा सभापतींना पत्र देऊन एक दिवशी अधिवेशन बोलावण्याची केली मागणी. मनोज जरांगे करीत असलेले उपोषण योग्य असून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मांडली भूमिका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. चार चाकी व लक्झरी बसचा हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये चारचाकीचा अक्षरशा चुराडा झाला आहे. जखमींना वाहनाच्या बाहेर काढत सिल्लोड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत
Kolhapur : दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. गोकुळने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये गोकुळने प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Nanded Rain : नांदेड तालुक्यातील सोमेश्वर रहाटी जैतापूर परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज पहाटे ढगफुटी झाल्याने नांदेडकडे जाणारा राहाटी पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड ते सोमेश्वर जैतापूर रहाटी या गावाचा संपर्क तुटला.
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील काळेगाव येथील साठवण तलावाच्या भिंतीवर हे तरुण अडकला होता. याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर त्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान आत्तापर्यंत लातूर जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थितीत अडकलेल्या दहा व्यक्तींची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पदक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केलीय. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरला पाचारण करण्यात आले असून हे पथक अहमदपूर येथे दाखल झाले असून, आवश्यकतेनुसार नागरिकांच्या शोध आणि बचाव कार्यासाठी या पथकाची मदत घेतली जाणार आहे.
लातूर : जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. नदी, नाले आणि ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने जिल्ह्यातील धनेगाव येथील निलंगा - उदगीर हा राज्य महामार्ग, शिऊर येथील निलंगा ते उदगीर, शिरूर अनंतपाळ ते निटूर, तगरखेडा ते औरादकडे जाणारे दोन रस्ते आणि गिरकचाळ येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. काल पुलावरून आणि रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास 39 रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यान, निलंगा तालुक्यातील शेळगी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर काल रात्री बाराच्या सुमारास वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
दहिसर टोल नाक्यावर पावसामुळे वाहतूक कोंडी
दहिसर टोल नाका जवळील उड्डाण पुलाखाली मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे दहिसर ते मीरा रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अचानक पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाला आहे
पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपार्ले सांताक्रुझ वांद्रे या सर्व परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
धाराशिवचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर. तसेच धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि उमरगाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आझाद मैदानात जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. धाराशिव मधील शिवसेनेचे तिन्ही लोकप्रतिनिधींनी एकत्र जरांगे पाटलांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू
सदावर्ते यांनी जरांगे यांना परवानगी नाकारावी व गुन्हा दाखल करावा असा अर्ज दाखल केला होता..या पार्श्वभूमीवर सदावर्ते आणि जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली होती
या आधी देखील आंदोलनकर्त्यांकडून सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोडही झाल्याने सुरक्षेची चिंता वाढली
हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात रश्मी शुक्ला यांची बैठक
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिफिंगसंदर्भात शुक्ला दाखल
सोबतच, गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भात देखील चर्चा
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेला संततधार पाऊस तसेच नांदेड आणि लातूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे परभणीच्या पालम तालुक्यामध्ये अनेक हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे तसेच पालम तालुक्यातील आरखेड, सोमेश्वर, फळा, उमरथडी, घोडा, पुयनी, आडगाव,वणभुजवाडी,तेलाजपुर या नऊ गावांचा संपर्क तुटलाय पालम शहराच्या जवळून जाणाऱ्या ओढ्यालाही पूर आलाय ज्यामुळे आजूबाजूची पूर्ण शेती पाण्याखाली गेली या नुकसानीची पाहणी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केली आहे सततच्या या नुकसानी मुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
राजूर–जाफराबाद महामार्गावर भरधाव कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली
अपघातात 5 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश
जाफराबाद तालुक्यातील देशगव्हाण फाट्याजवळील घटना
सकाळी सुमारे 6 वाजता अपघात घडला
विहिरीत अंदाजे 70 फूट पाणी असल्याने गाडी पाण्याखाली गेली.
एका प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, उर्वरित मृतदेह व कार अजूनही विहिरीत अडकलेली
ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमचे प्रयत्न सुरू
Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड आणि महागाव तालुक्यात आज सकाळ पासून विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या नाल्यांना पूर आला. पावसाचे वाढते प्रमाण पाहता शाळांना सुटी देण्यात आली.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले असून वाहनधारकांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनजीवन विस्कळीत झाले. उमरखेड शहरातील अनेक भागात दीड ते दोन फूट पाणी साचले. पावसाचा वेग असाच राहील तर शेती पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर दारव्हा तालुक्यातही पावसाने जोरधार हजेरी लावली आहे. दारव्हा शहरात पाणीच पानी असून वर्धमान, नगर, जिरापुरे कॉलनी कावेरी नगर, नातुवाडी आणि बस स्टॉप परीसर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे येथे खासगी बसला अपघात......
पहाटेच्या सुमारास बस रस्त्यामधील दुभाजक ओलांडून थेट दुकानवर जाऊन आधळली.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. बस आणि दुकानाचे मोठे नुकसान.
पहाटेच्या वेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस विरुद्ध दिशेला जाऊन आपटली.
अपघाताचे CCTV फुटेज आले समोर.
नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान.
नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
नांदेड शहरातील सर्वच रस्ते जलमय.
नांदेड शहरातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप.
वसंत नगर,दत्तनगर, श्रावस्ती नगर,आनंद नगर. भागात शिरलं पावसाचं पाणी.
नांदेड शहरातील जनजीवन विस्कळीत.
मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आजपासून सुरू होत असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील तीन धनगर आमदारांनी पाठिंबा दिल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना त्यांच्याच जिल्ह्यातून हा मोठा धक्का मानला जातो. सोलापूर जिल्ह्यात धनगर व ओबीसी समाजाचे मोठे प्राबल्य असून मनोज जरांगे यांना टोकाचा विरोध करणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हेही सोलापूर जिल्ह्यातील आहेत. असे असतानाही सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे तीन मोठे लोकनेते असलेले आमदारांनी थेट मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील या दोन्हीही पवार गटाच्या आमदारांनी मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख या तिसऱ्या धनगर आमदारांनीही आपला पाठिंबा म्हणून जरांगे यांना जाहीर केल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व धनगर आमदार एकमुखाने मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. याचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बसला असून जरांगे यांना टोकाचा विरोध करणाऱ्या हाके यांच्या जिल्ह्यातूनच कर समाज मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे
रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगरकडा, जवळा- पांचाळ,रेडगाव, वडगाव या गावांच्या शिवारात पावसाने थैमान घातले आहे. शेकडो एकर शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. तर ओढ्यांचा नद्यांचे पाणी थेट शेतामध्ये शिरल्याने सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून पाणी जात असल्याने डोंगरकडा ते जवळा पांचाळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर डोंगरकडा गावात सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे
गेल्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बीडच्या माजलगाव येथील धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे.आज सकाळी 6 वा.माजलगाव धरण 83 टक्के भरले असून अद्याप धरणात पाण्याची मोठी आवक सुरूच आहे.19 ऑगस्ट रोजी या धरणात केवळ 56 टक्के पाणीसाठा होता. माजलगाव धरणात पाण्याची आवक अशीच राहिल्यास पाणीपातळी 90 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडणे जाणार आहेत.माजलगाव धरणातून बीड सह जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतीसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग होत असल्याने या धरणाला महत्त्व आहे.
नांदेडमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
हवामान विभागाने अलर्ट दिला होता. त्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला
गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली पावसाचा जोर इतका होता की नांदेड शहरातील शिवाजीनगर वसरणी अन्य काही भागात घरामध्ये पाणी शिरलेला आहे.
नांदेड शहर इतरही तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड नंतर जो नायगाव तालुक्याला बसलेला आहे नायगाव मध्ये सध्या पाऊस हा रिमझिम स्वरूपात पडत असला तरी जनजीवन नांदेड सह नायगाव मध्ये देखील विस्कळीत झाले आहे
रस्त्यावर चोहूकडे पाणीच पाणी यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत ही वाहन चालवताना होत आहे
- नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात ऑटोसह एक तरुण गेला वाहून
- ऑटो मधील इतर दोन तरुण सुदैवाने बचावले
- नांदेडच्या किनवट तालुक्यातील बेल्लोरी पुलावरील घटना
- पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव लक्ष्मण रानमले.
- अंधार पडल्याने प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम थांबवली.
भरधाव वेगात चारचाकी वाहान विहिरीत जाऊन कोसळले.. जीवित हानी झाल्याची शक्यता..
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील घटना ..
गाढेगव्हाण फाट्यावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत चारचाकी (अंदाजे कार)वाहन कोसळले..
या वाहनात प्रवासी असण्याची शक्यता...
रेस्क्यू टीम दाखल होत असून, विहीरीत 60 फूट पाणी असल्याने अडथळा येत असल्याची माहिती...
भरधाव वेगात चारचाकी वाहान विहिरीत जाऊन कोसळले.. जीवित हानी झाल्याची शक्यता..
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील घटना ..
गाढेगव्हाण फाट्यावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत चारचाकी (अंदाजे कार)वाहन कोसळले..
या वाहनात प्रवासी असण्याची शक्यता...
रेस्क्यू टीम दाखल होत असून, विहीरीत 60 फूट पाणी असल्याने अडथळा येत असल्याची माहिती...
परभणीत काल पासुन संततधार पाऊस सुरू अधून मधून पावसाचा जोर वाढतोय.दोन दिवसांपासून जिल्हावासियांना सूर्यदर्शन नाही त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय.शहरासह जिल्ह्यात संततधार काम असल्याने प्रकल्पांमधून ही पाण्याचा विसर्ग केला जातोय.येलदरी च्या २ दरवाज्या मधून ७ हजार तर लोअर दुधनाच्या २ दरवाज्या मधून २ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे तिकडे गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
Manoj Jarange Maratha Reservation Rally: आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.
Manoj Jarange Maratha Reservation Rally: मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. वाशीत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...