मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांसोबतच निकालांवरही झाल्याचं दिसून येत आहे. 16 जुलै रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या विद्यार्थांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. साधारणपणे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात ते 10 दिवसांमध्ये दहावीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात येतो. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरपासूनच दहावीच्या निकालासंदर्भात पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


काही दिवसांपूर्वी बोलताना, दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुंबई बोर्डाचे सचिव संदीप संगवे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. तसेच, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.


जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागला. परंतु, अद्याप दहावीच्या निकालाची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही. दहावीच्या निकालाची आता विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर होता. पण कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता.


पाहा व्हिडीओ : बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड



राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे दहावीचा निकाल येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे.


देशात 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका शाळांमध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावीचा भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे या विषयांचं गुणदान कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार करत कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.


इतर विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला आहे. यामुळे आता दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


SSC Results 2020 | दहावीचा निकालही लवकरच, निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात


दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता. यावर्षी हा निकाल कधी लागतो याची सर्वांना उत्सुकता आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


SSC Results 2020 | दहावीचा निकाल कधी?; विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता