- कोकण- 96
- कोल्हापूर- 93.88
- पुणे- 92.08
- मुंबई- 90.41
- औरंगाबाद- 88.81
- नाशिक- 87.42
- अमरावती- 86.49
- लातूर- 86.30
- नागपूर- 85.97
दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.41 टक्के
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2018 11:10 AM (IST)
दहावीचा निकाल जाहीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
दहावीचा निकाल जाहीर- पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे. राज्यातील सुमारे 17 लाख 41 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित शाळांमध्ये वितरीत केली जाईल. एकूण निकाल - 89.41 टक्के मुलींची टक्केवारी- 91.97 टक्के मुलांची टक्केवारी - 87.27 टक्के विभागवार निकाल -