मुंबई : राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे.  या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर  मुंबईतही काही जागांवर बदल होणार शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 


आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप सध्या प्रत्येक लोकसभा मतदरसंघाचा आढावा घेत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शाह  आणि भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत  लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर चर्चा केली. मंगळवारी देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी भाजपचे मुंबईतील सर्व खासदार आणि आमदार यांची बैठक झाली. 


इच्छुकांमध्ये वादावादी होण्याची शक्यता


समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्व हे राज्यातील काही खासदारांच्या कामगिरीवर नाराज आहे. त्यामुळे या खासदारांचे तिकिट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदारांची गेल्या पाच वर्षाची कामगिरी पाहूनच तिकिट देणार आहे. काही दिवसाताच नावांवर चर्चा होईल आणि यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये वादावादी होऊ शकते.  त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 


 महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  ही यादी जाहीर केली आहे. 


2019 साली झालेल्या  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये  भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलेलं. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र त्यांना सरकार स्थापन करता आले नव्हते. यंदा मात्र लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांवर देखील भाजपने लक्ष्य केले आहे.   


हे ही वाचा :


Madhya Pradesh : मध्य प्रदेशची लिस्ट, भाजपमध्ये ट्विस्ट, दोन याद्या जाहीर, तरी मुख्यमंत्र्यांचं नावच नाही, शिवराजसिंहांना 'मामा' बनवलं?