Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा विवाहसोहळा आज थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी लावली होती. जळगावातील जामनेरमध्ये 14 एकर जागेवर हा  विवाहसोहळा संपन्न झाला. 


या विवाह सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.  गिरीश महाजन यांनी सर्व विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यामंडळींचं स्वागत केलं.


मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहारडी गावातील अक्षय अजय गुजर यांच्यासोबत गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाह झाला. अक्षय हे आयटी इंजिनियर असून त्यांचे वडील अजय गुजर हे शेती आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. 


दरम्यान, लग्नसोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यामांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, गिरीश महाजन यांच्याही लग्नाचा आज वाढदिवस आहे. परंतु, ते दोघे असे दिसत आहे की त्यांचेच लग्न आहे. त्यामुळे दोघांच्या मुलीचा लग्न सोहळा आहे हे सांगावे लागते. कोरोना काळात लग्न काढू नका असे सांगितले होते. तुमच्या लग्नात सर्वांना यायचे आहे अशी त्यांना विनंती केली होती. त्यांनी आमची विनंती मान्य केली. 



महत्वाच्या बातम्या


PHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी


Jalgaon : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात हातसफाई करणाऱ्याला चोप