Dr. Appasaheb Dharmadhikari : मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे (Maharashtra Bhushan Award) श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr Appasaheb Dharmadhikari) यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचं काम करणार असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.


मी प्रसिद्धीपासून लांब


आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना आप्पासाहेब बोलत होते. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब धर्माधिकारी हे वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते.  मी देखील माझा श्वास असेपर्यंत समाजसेवेचं काम सुरु राहणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करत आहेत असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच असे धर्माधिकारी म्हणाले. हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आहे. नानासाहेबांनी मोठं कष्ट केल्याचे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.


समाजसेवा सर्वात श्रेष्ठ 


समाजसेवा सर्वात श्रेष्ठ आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं. त्यामार्फत मी काम केलं आहे. यामध्ये वृक्षारोपण आहे. ते काम करावं हे देखील सांगितले जाते.  प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. माणवाने सदृ्ढ आयुष्य जगावं यासाठी आरोग्य शिबीर आपण घेतो. रक्तदान शिबीर आपण घेतो. रक्ताचा ज्याला गरज आहे त्याला मोठा उपयोग होईल. दुसऱ्याचे जीवन त्यामुळं वाचेल असे धर्माधिकारी म्हणाले. आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजसेवंच काम सुरु ठेवणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पाणी असते पण विकत घ्यावे लागते, त्यामुळं आपण पाणपोई उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी आपण बस थांबे तयार करत आहोत. तसेच जलसंधारणाचे काम देखील आपण करत आहोत. पाणी वाचवण्याचे काम आपण केलं पाहिजे असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. स्वच्छ भारत करण्यासाठी आणखी काम वाढवलं  पाहिजे. मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ असल्याचे धर्माधिकारी म्हणाले. पोलिस प्रशासनाचेही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले. 


आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम करावं


प्रत्येकाने मन स्वच्छ करावे. मन अस्थिर आहे. कधीच शांत बसत नाही. मन स्थिर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. कोणीही आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम केले पाहिजे. किर्ती सहसा मिळत नाही. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. प्रत्येकाने सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी. किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.   


महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde : माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे आप्पासाहेब, त्यांना पुरस्कार दिल्यानं महाराष्ट्राचा सन्मान वाढला : मुख्यमंत्री