Maharashtra Beed News : राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील अर्थात टीईटी परीक्षांमधील (TET Exams) झालेल्या घोटाळ्यात राज्यभरातील सात हजार आठशे पेक्षा जास्त शिक्षकांकडील टीईटीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचं पुढे आलं आहे.


मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये राज्यात आरोग्य विभागासोबतच शिक्षण विभागात झालेल्या भरतीत मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्यात बीड जिल्ह्याचा मोठा सहभाग समोर आला होता या भरती घोटाळा नंतर पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षेत सुद्धा घोटाळा झाल्याचे पुढे आले होते आणि या प्रकरणात आता बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षकांचे हे मोठे प्रमाण असल्याचे पाहायला मिळत आहे..


राज्यात जिल्हानिहाय बोगस शिक्षक


बीड – 338, परभणी – 163, हिंगोली – 43, अमरावती – 173,बुलढाणा – 340,अकोला – 143,वाशिम – 80,यवतमाळ – 70,नागपूर – 52,भंडारा – 15,गोंदिया – 09,वर्धा – 16,चंद्रपूर – 10,गडचिरोली – 10,लातूर – 157,उस्मानाबाद – 46, नांदेड – 259, मुंबई दक्षिण – 40,मुंबई पश्चिम – 63, मुंबई उत्तर – 60,रायगड – 42,ठाणे – 557,पालघर – 176,पुणे -395,अहमदनगर – 149,सोलापूर – 171,नाशिक – 1154,धुळे – 1002,जळगाव – 614,नंदुरबार – 808,कोल्हापूर – 126,सातारा – 58रत्नागिरी – 37, सिंधुदुर्ग – 22, औरंगाबाद – 458,जालना – 114. 


शिक्षक पत्रकार परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात राज्य शिक्षक परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे याची अटक झाली होती. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असतानाच मोठ्या प्रमाणात टीईटी प्रमाणपत्र परीक्षेत शिक्षकांची बोगसगिरी झाल्याचे पाहायला मिळत होते आणि म्हणूनच सरकारकडून 2017 पासून परीक्षा दिलेल्या आणि नोकरीला लागलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्यात आली यामध्ये शिक्षण विभागाकडून टीईटी प्रमाणपत्रांची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली त्यामध्ये राज्यभरातून 7880 शिक्षकाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले.


टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत झालेली अटक


राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे ( अहमदनगर )  तुकाराम सुपे ( पुणे )  जी ए सॉफ्टवेअर कंपनी चा माजी संचालक अश्विनकुमार (बंगंळुरू) डॉक्टर प्रितिष देशमुख (पुणे) शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच एजंट संतोष हरकळ ( औरंगाबाद )  अंकुश हरकळ स्वप्नील पाटील ( नाशिक ) सुरजित पाटील ( नाशिक ) मुकुंद सूर्यवंशी ( नाशिक )  निखिल कदम ( पुणे ) यांना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :