Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद
Maharashtra Bandh Live Updates : लखीमपूरमध्ये (Lakhimpur) शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
लखीमपुर-खीरी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र या बंदला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद सरकारी दहशतवाद असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आणि याच टीकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उत्तर देत लखीमपूर या ठिकाणी झालेली घटना ही सरकारी दहशतवाद नव्हता का असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे तर महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे काही मतभेद असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा बंद मह विकास आघाडी सरकारने पुकारला त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे देखील राजू शेट्टी म्हणाले
बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करत असताना भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते आक्रमक झाले. त्यांनी बळजबरीने दुकान बंद केलं व दुकानदाराला आत कोंडून ठेवलं. पोलीस आल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर प्रचंड घोषणाबाजी देत महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करत असताना भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते आक्रमक झाले. त्यांनी बळजबरीने दुकान बंद केलं व दुकानदाराला आत कोंडून ठेवलं. पोलीस आल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर प्रचंड घोषणाबाजी देत महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या जिल्हा बंद मध्ये शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना स्टाईलने कोल्हापूर कडकडीत बंद करण्यात आला. शेतकरी हत्येचा निषेध नोंदवत शहरातून भव्य दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज केलेल्या महाराष्ट्र बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सावंतवाडीतील मुख्य चौकात आज शेतकऱ्यांना पाठींबा देत आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुंडलिक दळवी उपस्थित होते. या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली.
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद, घटनेचा निषेध करण्यासाठी अलिबाग, उरणमध्ये रॅली, मुरूड आणि खोपोली येथे निदर्शने
महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत बंद कधीच झाला नाही. महाराष्ट्र बंदसाठी सरकारी यंत्रणांकडून दबाव आणण्याचं काम मविआ नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. लखीमपुर येथे झालेली घटना वाईट आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण देश या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपुरच्या घटनेचा वापर होत असल्याची टीका आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
शिवसैनिकांचा कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात गोंधळ, कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचं आवाहन, पोलीस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये वाद
Maharashtra bandh live Updates : हे ढोंगी सरकार आहे, लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत नाही, देवेंद्र फडणवीसांचा आरोप. भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं असे शेतकरी बोलत आहेत आताचं सरकार हे ढोंगीबाज आहे- फडणवीस
महाविकास आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदला आज औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. व्यापारी आघाडीच्या वतीने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही, मात्र ज्या व्यापाऱ्यांना बंद करायचा असेल ते बंद पाळू शकतात अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महा विकास आघाडीचे नेते पैठण गेट पासून रस्त्यावर उतरले. त्यांनी सुरू असलेल्या दुकान बंद करण्याचे आव्हान केले. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, दुकाने देखील बंद केली. पैठणगेट ते शहागंज असा मोर्चा काढत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केलं होतं.
कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला राज्यभरात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळतोय तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. या बंदसंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय. लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावलं जातं आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारलं होतं. याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारलं, असं पाटील म्हणाले.
वाचा संपूर्ण बातमी-
https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-chandrakant-patil-gopichand-padalkar-allegation-on-mahavikas-aghadi-cm-uddhav-thackeray-shiv-sena-ncp-sharad-pawar-maharashtra-bandh-live-updates-1007184
चंद्रपूर : शिवसैनिकांकडून शिवभोजन केंद्राची तोडफोड... चंद्रपुरात महाराष्ट्र बंद दरम्यान आंदोलक शिवसैनिकांनी केली तोडफोड, मुख्य बस स्थानकासमोर शिवभोजन देणाऱ्या हॉटेलात तोडफोड, आंदोलकांनी हॉटेलातील तयार खाद्यपदार्थ फेकून व्यक्त केला रोष, या हॉटेलमधील शिवभोजन फलकाची देखील नासधूस, तयार खाद्यपदार्थ ठेवलेल्या काचेच्या डब्यांची देखील तोडफोड, काही क्षणात झालेल्या या घटनेनंतर परिसरात तणाव, मात्र हॉटेल चालकांचे यावर बोलण्यास किंवा तक्रार देण्यास नकार, शिवसैनिकांनी आझाद बगीचा चौकात सुरू असलेले रिलायन्स ट्रेंड्स हे मॉल वजा दुकान देखील फोडले
लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.
'महाराष्ट्र बंद' मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगतानाच सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले आहेत. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या विरोधात आज महाराष्ट्र विकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला अकोल्यासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीरोड आणि टिळक रोडवरील दुकानं यावेळी पूर्णपणे बंद आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाणं बंद करण्याची विनंती केलीय. या बंदमध्ये जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय. लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावलं जातं आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारलं होतं. याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारलं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नागपुरात एकत्रित येत नागपूरची सर्वात प्रमुख सीताबर्डीची बाजारपेठ बंद पाडली...
सकाळीच तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित आले आणि तिथून रॅली काढत बाजारातील व्यापाऱ्यांना त्यांची दुकानं बंद करण्यास सांगितले...
मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी ही बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद केली...
विशेष म्हणजे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने कालच लखीमपूर मधील घटनेचा आम्ही निषेध करतो मात्र बंदच्या हाकेला आम्ही प्रतिसाद देणार नाही असं जाहीर केलं होतं...
मात्र, आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यानंतर व्यापाऱ्यांनीही दुकानाचा कुठलाही नुकसान होऊ नये या भीतीपायी आपापली दुकाने बंद केली...
दरम्यान रॅली बाजारातून पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने दुकान पुन्हा उघडायला सुरुवातही झाली...
जालना येथे आज लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील वेगवेगळ्या चौकात निदर्शने देखील करण्यात आले, या रॅली मध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा सहभाग होता,दरम्यान आज बंद च्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य व्यापारी प्रतिष्टान अनेक ठिकाणी बंद असलेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी मात्र या बंद ला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
अमरावती शहरात महाविकास आघाडी कडून जबरदस्ती दुकानं बंद करणं सुरू, अमरावती शहरातील अनेक व्यापार पेठ सुरू दिसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जबरदस्ती दुकानाचे शटर खाली करून दुकानं बंद केली...
यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत व्यापार पेठ बंद केली...
महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरली आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला विक्रोळीचे आमदार सुनील राऊत हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आणि टायर जाळून निषेध केला. त्याच बरोबर रास्ता रोको सुद्धा केला यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला ठाण्याकडे जाणारी तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे जो पास वीस मिनिट पासून ही वाहतूक पूर्णत बंद झालेली आहे पोलीस आले आणि कार्यकर्त्यांना बाजूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
अहमदनगरला सरकारच्या महाराष्ट्र बंदला न जुमानता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवली आहे. तर बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक पहिला मिळाली. यावेळी नगरच्या बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे भारत बंदला नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा मिळतांना दिसत नाहीये. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी मार्केट सुरू असल्याचे चित्र दिसतंय.
बंदमध्ये महाबळेश्वर परिसरात आज शुकशुकाट दिसत होता. कायमच पर्यटकांनी गजबजणारे वेण्णालेकचे हे ठिकाण आज ओस पडल्याचे दिसून आले. महाराष्ट्रबंदची घोषणा केल्यानंतर पर्यटकांनी सावध भूमिका घेतली होतीच. शिवाय काही पर्यटकांनी मात्र या थंड हवेच्या ठिकाणच्या बंद खोलीतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे या शुकशुकाटातून दिसून येत होते.
उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीने पुकारलेलेल्या बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरीमध्ये न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकलेच्या घटनेचा संपूर्ण निषेध होत असताना उस्मानाबादमधील काही लोकांनी आपली दुकाने बंद ठेवली तर काहींनी चालू ठेवल्याने रस्त्यावर गर्दी दिसत आहे. शेतकऱ्यांशी संबंधित असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र बंद आहे.
उत्तर प्रदेश मधील लखीमपूर मधील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे या बंदात सहभागी झाले आहेत.चेंबूरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शन येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत आंदोलन केले.पूर्व द्रुतगती मार्गावर कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.या वेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला घेतले.मात्र तरी देखील आंदोलक रस्त्यावर बसून ठिय्या देऊ लागले.या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करू लागले, काही वेळाने पोलिसांनी आंदोलकाना बाजूला केले.
लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद, वाशी, पुणे, नाशिक बाजारसमित्यांचे व्यवहार पूर्ण ठप्प, भाजप-मनसेचा बंदला विरोध..एसटी आणि रेल्वेसेवा मात्र सुरळीत.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा सामील झाले. जिल्ह्यातील मेहकर येथे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव , शिवसेना आमदार डॉ संजय रायमूलकर रस्त्यावर उतरले असून त्यांनी मुंबई - नागपूर महामार्ग अडवला. मेहकर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बवड असून सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे , जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्या आज बंद ठेवण्यात आल्या असून काही ठिकाणी तणावाच्या परिस्थिती निर्मान झाल्या होत्या.पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला अल्प प्रतिसाद, कणकवलीत महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, मोदी सरकार विरोधात घोषणा देत शहरातून रॅली, कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले नेतृत्व
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिसांचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरातून संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी १० नंतर वसई रेल्वे स्थानकाजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून, रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. माञ आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माणिकपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसई, विरार, नालासोपारा येथे ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली आहे. तर मिरा भाईंदरमध्ये ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदसाठी रस्त्यावर उतरले होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पी एम पी एम एल बस सेवा आज महाराष्ट्र बंदमुळे बंद ठेवण्यात आलीय. मात्र त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांकडून रिक्षा चालक लुट करतानाचं चित्र पहायला मिळतेय. बस बंद राहणार असल्याने रिक्षा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यात. मात्र रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडं आकारलं जात असल्याबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. पुण्यातील स्वारगेट भागातून घेतलेला हा आढावा.
काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या सर्वात प्रमुख सीताबर्डी बाजारपेठेत रॅली काढून दुकान बंद करायला लावली. सीताबर्डीची बाजारपेठ सकाळी दहाच्या सुमारास सुरू होते. दुकाने उघडली जात असतानाच कार्यकर्त्यांनी बाजारात रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली आणि दुकानदारांना दुकान बंद करायला लावली...
लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज राज्य सरकारच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी वतीने बंद पुकारण्यात आला. या वेळी मोदी सरकार भाजपा सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाशीम शहरातील मुख्य चौकासह शहरातील इतर चौक बंद करण्यात आले
नांदेड: केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्या विरोधात व उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याचा घटनेचा निषेधार्थ व केंद्र सरकार आणि भाजपाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रतील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा ,कृषी उत्पन्न बाजार समित्या आज पूर्ण पणे बंद ठेऊन निषेध आंदोलन करण्यात येतोय. त्याच पद्धतीने जिल्हा भरातील ग्रामीण भागाची नाळ समजल्या जाणाऱ्या लाल परीही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीये. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. महाविकास आघाडीने पुरकरलेल्या या बंदला आपली दुकाने आणि व्यापारी संस्था बंद ठेऊन ,व्यापारी आणि शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलाय.
लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने धुळे शहरातील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले, या आवाहनाला व्यापाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या लहान व्यवसायिकांनी देखील या बंदमध्ये सहभागी होत आपला पाठिंबा दर्शवला चित्र पाहायला मिळाले.
Maharashtra Bandh : वाहतुकीचे कोणते मार्ग खुले? वाहतूक कुठे सुरू? महाराष्ट्र बंद अपडेट्स
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून Maharashtra Bandh चा आढावा, शेतकरी, व्यापाऱ्यांचा पाठिंबा
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे सर्व नेते आंदोलनात सहभागी, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे संतोष पवार, भारत जाधव यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित
'महाराष्ट्र बंदची हाक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साथ', मंत्री यशोमती ठाकूर यांचा बंदला पाठिंबा
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.यात आता शिवसेना प्रणित अदानी इलेक्ट्रिसीटीमधील सर्व संघटना आणि स्थानिय लोकाधिकार समितीमधील कामगारांनी आज बंद पुकारला आहे.चेंबूर मधील अदानी इलेक्टरीसीटी कार्यालय बाहेर या कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. काळ्या फिती बांधून आणि घोषणाबाजी करीत कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले. लखीमपूर घटना , महागाई आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न अश्या विविध मुद्द्यांवर या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
: महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा अशी सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीये. महाविकासआघाडीसह अन्य संघटनांनी आज बंद पुकारला आहे. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी देखील सहभागी होतील. असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पोलीस त्यांचं काम चोख बजावतील, त्यामुळे हा बंद शांततेत पार पाडावा अशी सूचना त्यांनी आंदोलनकर्त्यांना केली.
मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, शिवसैनिकांकडून अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न
https://marathi.abplive.com/news/maharashtra/saamana-editorial-on-maharashtra-bandh-why-todays-maharashtra-bandh-shivsena-said-the-reason-also-criticized-modi-1007149
महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरातून सकाळच्या पहिल्या सत्रात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद दिसून आला मात्र या बंदच्या संदर्भात धुळे जिल्हा व्यापारी महासंघाने तटस्थ भूमिका घेतली असून सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आत्ताच कुठे व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरू झालेला असताना अशाप्रकारे बंद पाळून आमचे होणारे नुकसान कसे भरून निघणार असा प्रश्न व्यापारी महासंघाने उपस्थित केला आहे
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.... यावेळी शिवसैनिकांनी दहा ते पंधरा मिनिटे महामार्ग रोखला... त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या...यावेळी पोलिसांनी सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले...आणि महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली..
लखीमपूर घटनेच्या निषेर्धात महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाडमध्ये प्रतिसाद मिळाला असून सकाळ पासूनच सर्व दुकान बंद असल्याचं पहावयास मिळाले.तर या बंद ला पाठिंबा देत जिल्हयातील लासलगावसह,मनमाड,येवला,चांदवड अन्य सर्व ठिकाणच्या बाजार समिती बंद ठेवण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचा समर्थनार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय सकाळच्या पहिल्या टप्प्यात पूर्णतः बंद होते शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर धडगाव आणि नंदुरबार तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस प्रशासन घडामोडींवर लक्ष ठेवून आहे तर भाजपाने या बंदला विरोध केला आहे सकाळपासूनच महा विकास आघाडीचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करताना दिसून येत आहेत
रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील खेड, लांजा, राजापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. तर, रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. आजच्या दिवशी एसटीसेवेसह अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायाला मिळत आहे.
लखीमपूर खेरी घटनेनंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे....महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे...कोल्हापुरातील बाजार समितीमध्ये मात्र भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहिले आहेत...आज शेतीमालाची आवक थोडीशी कमी झाली असली तरी सौदे मात्र होतं आहेत...भाजीपाला हा नाशवंत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समितीमधील व्यवहार सुरूच आहेत..
नवी मुंबई : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे जी हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी दिली आहे. या संपात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील सहभाग पाहिला मिळत आहे. एरवी या मार्केट मध्ये 600 ते 700 गाड्या आल्याचं पाहिला मिळतात आज मात्र मार्केट मध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहिला मिळत आहे. याठिकाणी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी संपाला सक्रिय पाठींबा दिला आहे. जी घटना घडली ती पूर्णपणे निषेधार्ह आहे. त्यामुळेचं आम्ही देखील संपात उतरलो असलं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
नाशिक मधील सिटी आणि एसटी वाहतूक सुरळीत सुरू, रोज प्रमाणेच फेऱ्या होत आहेत, वाहतुकीवर अद्याप परिणाम नाही
पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल बस सेवा किमान दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. बारानंतर परिस्थिती पाहून बसेस सुरु करायच्या की नाही हे प्रशासनाकडून ठरवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शेकडो बसेस डेपोंमधे पार्क करण्यात आल्यात.
युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होऊन रोडवरती टायर जाळून बंदची सुरुवात झाला. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा निषेध करत राजीनामा द्यावा व भारतीय शेतकरी जिंदाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या.
युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होऊन रोडवरती टायर जाळून बंदची सुरुवात झाला. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा निषेध करत राजीनामा द्यावा व भारतीय शेतकरी जिंदाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या.
नंदुरबार: महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त, 1100 पोलीस कर्मचारी आणि 100 अधिकारी 400 होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात, मित्र पक्षांची सर्वच तालुक्यात बंदची हाक, भाजपचा बंदला विरोध, जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील व्यवहार राहणार आहेत बंद
अत्यावश्यक सेवेत असल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यवहार बंद न करता महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने हा निर्णय घेतलाय. राज्यातील प्रमुख बाजार पेठ पैकी सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे. दररोज या ठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होत असते. जर आज बंद केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. म्हणून दररोज पहाटे सुरू होणारे भाजीपाला, फळांचे लिलाव हे सुरळीत पार पडले. मात्र सकाळी 9 वाजता सुरू होणारे कांद्याचे लिलाव मात्र आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंद ला पाठिंबा देण्यात येणार आहे.
बंदवरुन मनसेच्या संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला, म्हणाले, शेतकरी विरोधी बिल मांडलं जात असताना शेपूट घालून का बसले?
Maharashtra Bandh: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, कुणाकुणाचा पाठिंबा?
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-bandh-mahavikas-aghadi-aggressive-over-lakhimpur-incident-call-for-maharashtra-bandh-on-today-11th-october-1007134
शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईतील अनेक आगारातून बेस्ट बस पहाटेपासून निघालेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकर रोज बसने प्रवास करतात त्यांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आणि महा विकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आज बेस्ट बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये साधारणपणे जवळपास वीस हजार कामगार कर्मचारी वर्ग या बंदला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आता मोठा परिणाम बेस्ट वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय. दादर स्टेशनबाहेर एकही बेस्टची बस न आल्याने प्रवाशांची रांग स्टेशन बाहेर पाहायला मिळत असून शेअरिंग टॅक्सीने मुंबईकर प्रवास करताना पाहायला मिळत आहेत.
अत्यावश्यक सेवेत असल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यवहार बंद न करता महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने हा निर्णय घेतलाय. राज्यातील प्रमुख बाजार पेठ पैकी सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे. दररोज या ठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होत असते. जर आज बंद केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. म्हणून दररोज पहाटे सुरू होणारे भाजीपाला, फळांचे लिलाव हे सुरळीत पार पडले. मात्र सकाळी 9 वाजता सुरू होणारे कांद्याचे लिलाव मात्र आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात येणार आहे.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पी एम टी बस सेवा आज बंद राहणार..
महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये सुरवात,जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीबंद ठेवून लखीमपूर घटनेचा शेतकरी, व्यापाऱ्यांकडून निषेध बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट दिसत आहे, तर बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर बाजार थाटल्याचं दृश्य आहे, बंदला पाठिंबा आहे मात्र, भाजीपाला नाशवंत असल्यानं नुकसान टाळण्यासाठी विक्रीला आणण्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, बाजार समितीने भाजीपाला विक्रीची व्यवस्था उभी करणं आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे
महाविकासआघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे.. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली
उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे जी हिंसाचाराची घटना घडली त्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी दिली आहे. या संपात नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील सहभाग पाहिला मिळत आहे. एरवी या मार्केट मध्ये 600 ते 700 गाड्या आल्याचं पाहिला मिळतात आज मात्र मार्केट मध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहिला मिळत आहे. याठिकाणी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी संपाला सक्रिय पाठींबा दिला आहे. जी घटना घडली ती पुर्णपणे निषेधार्ह आहे. त्यामुळेचं आम्ही देखील संपात उतरलो असलं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशन (FRTWA) नं देखील बंदला पाठिंबा दिला आहे, दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार, FRTWA चे अध्यक्ष वीरेन शाह यांची माहिती, काल केला होता बंदला विरोध
मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
नवीन तीन कृषी कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव देणारा कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत 10 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याला पाठींबा देण्यासाठी देशभरातले शेतकरी आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाठींबा देत आहेत. याचाच एक भाग म्हणून, उत्तरप्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि चीथावणीखोर वक्तव्य केले होते.
"आम्हाला संधी मिळू द्या, मग शेतकऱ्यांना कसे दोन मिनिटात सरळ करतो पहा." त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. ही निदर्शने करून शेतकरी शांतपणे आपल्या घराकडे परत जात होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनीने त्याच्या सहकाऱ्यांसह घरी परतत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले. इंग्रजांनीही कधी एवढ्या क्रूरपणे शेतकऱ्यांना गाड्यांखाली चिरडले नव्हते. जनरल डायरलाही लाजवेल असे हे कृत्य आहे. देशभर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. जनतेने या बंदमध्ये उत्स्फूर्त आणि सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन युवक क्रांती दल करत आहे.
पार्श्वभूमी
मुंबई (Mumbai) : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
शरद पवार म्हणाले...
शरद पवार यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, उत्तरप्रदेशाबाबत माझ्यासह सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली, महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेचा निषेध केला. मी स्वत: शेतकऱ्यांवरील या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली, त्याचा संताप व राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला आहे, त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही, असं पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले
दरम्यान अजित पवारांनी म्हटलं आहे की, आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -