जळगाव: दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिल्ह्यातील साकळी गावातून एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेल्याची माहिती एटीएसनं तरुणाच्या नातेवाईकांना दिली. पथकाने या युवकाच्या घराची जवळपास अडीच ते तीन तास झाडाझडती घेतली. कोणत्या प्रकरणाबाबत एटीएसनं कारवाई केलीय, याची प्रचंड गोपनीयता एटीएसनं बाळगली आहे.
शिवाय त्याच्या घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती पथकाने दिली नाही. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या युवकाचा दुचाकीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे.
एटीएसच्या कारवाईचं हे वृत्त हळूहळू साकळीसह यावल तालुक्यात समजताच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या तरुणाला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतलं असावं, इतक्या वेळ बंद घरात काय चौकशी आणि पाहणी केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
ज्या तरुणाला ताब्यात घेतलंय, तो मूळचा रमुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील हिवासी आहे. त्याचं मोटारसायकल गॅरेज आहे.
संबंधित बातम्या
'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड
घरात स्फोटकं सापडलेला वैभव राऊत नेमका कोण?
स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच
स्पेशल रिपोर्ट @8.30 : गोरक्षक म्हणवणारा वैभव राऊत बॉम्बचं काय करणार होता?
मुंबई | स्फोटक प्रकरणात अटक केलेले आमचे साधक नाहीत, 'सनातन'ने हात झटकले
सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार
नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस