Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोमवारी, पहिल्या दिवशी सीमा प्रश्नाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती. सोमवारी बेळगावात कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) कार्यकर्त्यांवर दडपशाही करत अटक केली. त्याचे पडसादही आजच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मार्गदर्शन करणार आहेत.

Continues below advertisement

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमानाच्या मुद्यावर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. राज्य सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. 

उद्धव ठाकरे कामकाजात सहभागी होणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.  बैठकीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे, सचिन अहिर, अजय चौधरी, नितीन देशमुख, सुनिल शिंदे, विलास पोतनीस, सुनिल प्रभू  आदी उपस्थित होते. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याबाबत यात चर्चा झाली असल्याचे समजते. आज सकाळी, पुन्हा महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. 

Continues below advertisement

सोमवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या कामकाजात विधानसभेत 52, 327 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. ग्रामीण विकास 4,838 कोटी‌, शालेय शिक्षण खाते 3,210 कोटी,  सार्वजनिक बांधकाम खाते 2,344 कोटी, नगरविकास  2,076 कोटी, पशू संवर्धन 1,183 कोटी, दुग्धविकास 1,437 कोटींची तरतूद करण्यात आली. तर, नुकसान भरुपाईसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: