Nagpur : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session 2023) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांसाठी माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांच्याकडे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पण या कार्यक्रमाला अजित पवार  (Ajit Pawar) जाणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज माजी खासदार विजय दर्डा यांच्याकडे स्नेहभोजणास जाणार होते. परंतू, अजित पवार यांचं जाणं अचानक रद्द झालं आहे. अजित पवार हे सध्या विजयगड आपल्या सरकारी निवासस्थानी आहेत.


विजय दर्डा हे लोकमत समूहाचे प्रमुख आहेत. तसेच ते माजी खासदार देखील आहेत. त्यांनी आज मंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या आमदारांना स्नेहभोडनासाठी बोलावलं आहे. या कार्यक्रमाला अजित पवार जाणार होते. मात्र, अचानक अजित पवार यांचं या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणं रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार नेमके का गेले नाहीत याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. 


नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, फडणवीसांचं अजित पवारांना पत्र


दरम्यान, या सगळ्या घडामोडीतच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी पत्र लिहलं आहे. जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले होते. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे. 


पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र


नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Devendra Fadnavis On Nawab Malik : मोठी बातमी : नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र