Maharashtra Winter Session Live Updates: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईला होणार

Maharashtra Winter Session Live Updates: महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. जाणून घ्या विधीमंडळ अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Dec 2022 07:45 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Winter Session Live Updates: अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) आज अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले...More

CM Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले... 

CM Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले... 


नागपूर मधलं हे पहिलं अधिवेशन, दोन वर्ष झाली नाहीत. पण सरकार बदललं नसतं तर तेही कोविडच्या नावाखाली झालं नसतं. नागपूर अधिवेशन विदर्भासाठी महत्वाचं असतं, सभागृह सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत चालत होते.  


अनेक प्रलंबित प्रश्न या अधिवेशनात मार्गी लागले


धानाचा महत्वाचा निर्णयामुळे त्यातील दलालीला चाप बसेल


विरोधकांनी हा विषय लावून नाही घरला. मात्र शेतकऱ्याला जे हवंय ते आम्ही दिलं


समतोल प्रादेशिक विकासााठीही प्रयत्न करू


नागपूर ते गोवा नवा महामार्ग होईल


पर्यटनालाही चालना देतोय


गोसेखुर्द प्रकल्पाचं काम सुरू आहे


पूर्वीचं आम्ही सांगत नाही खर्च झाला पण जमीन पाण्याखाली आली नाही


आम्ही १८ प्रकल्प आणले त्यामुळे ४५ हजार रोजगार मिळेल


राज्यात ७० हजाराची गुंतवणूक येत आहे


खनिज उद्योगालाही चालना दिली 


गोसेखुर्दचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल


असे अनेक प्रकल्पांना चालना देण्यासाठीच महत्वाचे निर्णय घेतले


यामुळे विदर्भातील आत्महत्या कमी होतील ही अपेक्षा आहे.


यामध्ये निधीही कुठे कमी पडणार नाही याचीही तजवीज सरकार करते आहे


विरोधीपक्षाने सुरवातीला तीन चार दिवस आंदोलन सुरू होतं


आंदोलनाचे विषयचं नव्हते ण आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला


मात्र सभागृहापेक्षा ते बाहेर केला. त्यांच्याही प्रश्नांना उत्तर दिली


विरोधी पक्षाच्याही सूचना आम्ही घेतल्या. त्यानीही कामकाजाच सहकार्य केल्याने त्यांचे ही धन्यवाद मानतो


सरकारकडून त्रुटी रहात असतील तर विरोधी पक्षला तो सुचवायचा अधिकार आहे


अधिवेशन चांगलं झालं विदर्भ वासियांसाठी हे अधिवेशन महत्वाचं झालं


विरोधकांनी आरोप केले पण  NIT चं प्रकरण न्यायालयानं मिटवलं