Maharashtra Winter Session Live Updates:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना सोपवलं पत्र

Maharashtra Winter Session Live Updates: महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार असून कामकाजाचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. जाणून घ्या विधीमंडळ अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Dec 2022 11:51 PM
विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, अजित पवारांचं वक्तव्य 

विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, अजित पवारांचं वक्तव्य 


आज महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात मांडला होता अविश्वास प्रस्ताव


पण विरोधी पक्षनेत्याला माहिती नसल्याचं अजित दादानी केलं वक्तव्य

राज्यात आता 'स्मार्ट अंगणवाडी' होणार 

राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने दत्तक योजना सुरू केली आहे.  या योजनांमध्ये बड्या कॉर्पोरेट कंपन्या आणि सामाजिक संस्थांनी सामील होण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या ३ महिन्यात तब्बल ८०० हून अधिक सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी अंगणवाडी दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी ही आपापल्या मतदारसंघातील अंगणवाडी दत्तक घेण्याचे आवाहन लोढा यांनी केले आहे. त्यामुळे या आवाहनाला आता किती आमदार प्रतिसाद देणार? याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एसी कार्यालयात बसून आदेश किंवा काम कोणीही करू शकतो पण बच्चू कडू या पालात राहत आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  काय म्हणाले...


शिवसेना भाजप युती आलेली आहे इथे..


बच्चू कडू हे न्याय हक्कासाठी लढतात. त्याच कोणी नाही वाली, त्याच बच्चू कडू वाली आहे...


आपली मागणी मोठी नाहीये. शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलाची अटी वेगवेगळी आहे. याचा पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करू.. 


पिढ्यान पिढ्या आपण कच्च्या पालामध्ये राहतात. प्रत्येकाला घर पाहिजे ही काही मोठी मागणी नाही. पण नक्की चांगले दिवस येतील.. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू..


एसी कार्यालयात बसून आदेश किंवा काम कोणीही करू शकतो पण बच्चू कडू या पालात राहत आहेत

आमचा पगार कमी करा पण या लोकांना पाल मुक्त करा - आमदार बच्चू कडू

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले...


काल मी या पाल घरचे फोटो मुख्यमंत्री यांना दाखवले आणि त्यांनी तेव्हाच सांगितले की मी इथे येणारच आणि ते आज आले..


मी 20 वर्षाच्या राजकारणात असा मुख्यमंत्री कधीही पाहिला नाही..


हे सरकार बदलणार हे नाथजोगी यांनी आधीच सांगितले होते.. 


ग्रामीण भागात पंतप्रधान घरकुल योजनेत 21 प्रकारच्या अटीशर्ती दिल्या आहे.. त्यात बदल करणेचं गरजेचं आहे..


आमचा पगार कमी करा पण या लोकांना पाल मुक्त करा हीच माझी मागणी..

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात येऊन भेट घेतली

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात येऊन भेट घेतली. माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि मला न्याय मिळवून द्यावा या संदर्भातले निवेदन फडणवीस यांना या महिलेने दिले. ही तक्रारदार महिला विधान विधानभवनात जाऊन फडणवीस यांना भेटली. त्यामुळे या महिलेला पास कोणी दिला. या महिलेच्या भेटीमागे काही राजकीय नेते आहेत का? यावरून उद्या विधानभवनात  राजकारण तापण्याची शक्यता आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी मुख्यमंत्री दाखल

आमदार बच्चू कडू हे मागील दोन दिवसांपासून नागपूरवरून 30 किलोमीटरवर हक्काच्या घरासाठी 'कच्च्या मातीच्या पालघरात' ते विधानभवन असं आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलन स्थळी पोहचलेत..

मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना सोपवलं पत्र, सुनील केदार,सुनील प्रभु,सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी दिलं पत्र

मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना सोपवलं पत्र, सुनील केदार,सुनील प्रभु,सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी दिलं पत्र

विधान परिषदेचं आजचं कामकाज स्थगित. . उद्या सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल

विधान परिषदेचं आजचं कामकाज स्थगित. . उद्या सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना, टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना, टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर,पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार, शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर,पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार, शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Maharashtra Winter Session: स्वाधार सारखी योजना आता ओबीसीसाठी लागू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Winter Session: स्वाधार सारखी योजना आता ओबीसीसाठी लागू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत केली. ओबीसींचे किमान पाच होस्टेल सुरू व्हावे यासाठी जागा शोधलेल्या आहेत आणि ते सुरू केले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

Maharashtra Winter Session: 2004 मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण पवार साहेबांनी नाकारली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना टोला

Maharashtra Winter Session: 2004 मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण पवार साहेबांनी नाकारली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना टोला 

LIVE: उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

LIVE: उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद 


LIVE: उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

LIVE: उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद 


Maharashtra Winter Session: मुंबईतील कुर्ला महानंदनगर झोपडपट्टी प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

Maharashtra Winter Session: मुंबईतील कुर्ला महानंदनगर झोपडपट्टी प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विकासकाला 'स्टॉप वर्क'चे आदेश दिले आहेत. आयआयटीने जे बदल सुचवले आहेत याला नागरिकांनी देखील परवनगी द्यावी अशी विनंती स्थानिकांना करत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. 

Maharashtra Winter Session: गावातील पाणीपुरवठा योजना सक्षम राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागात 1313 पदभरती करणार; मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती

Maharashtra Winter Session: गावातील पाणीपुरवठा योजना सक्षम राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागात 1313 पदभरती करणार


प्रत्येक तालुक्याला उपअभियंता पद निर्माण करणार


सध्या तीन तालुके मिळून एक उपअभियंता पदाची तरतूद आहे


पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती

Maharashtra Assembly Winter Session: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Assembly Winter Session:  विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून खोके आणि खेळण्यातील बोक्यांची बाहुली घेऊन विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे. 

Maharashtra Winter Session: संत्र्यावरील आयात शुल्क कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

Maharashtra Assembly Session: आपण नागपूर संत्रा नगरी आपण म्हणतो मग इथ त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग किती आहेत? 2 लाख टन बांगलादेशला जातो. 33 रुपये आयात शुल्क होते ते आता 57 रुपये करण्यात आले आणि काल त्यात वाढ करून 63 रुपये आयात शुल्क करण्यात आले. त्यामुळे संत्रा आयात शुल्क कमी करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात दाखल, डॉ. हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले वंदन

Maharashtra Winter Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यांनी डॉ. हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड आदी उपस्थित आहेत. 

मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माहिती 

Maharashtra Assembly Winter Session: मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, महापुरुषांबाबतचे अपमानास्पद वक्तव्य आदी मुद्दे विधानसभेत उपस्थित करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली, 

Maharashtra Winter Session: उद्योग क्षेत्रात मागील पाच महिन्यात कोणी बदनामी केली, याचे उत्तर आज देणार; उदय सामंत यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Assembly Winter Session:  उद्योग पाच महिन्यात गेली अशी बोंबाबोंब झाली त्याचे उत्तर आज दिले जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. काही न करता पापाचे धनी केले जाते होते. त्याची माहिती आज सभागृहात देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. 

Maharashtra Winter Session Live: अंतिम आठवडा प्रस्तावात महापुरुषांबाबत केलेली वक्तव्ये आणि राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधणार; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे प्रतिपादन

अंतिम आठवडा प्रस्तावात महापुरुषांबाबत केलेली वक्तव्य, राज्यात वाढणारी गुन्हेगारी यावर आम्ही बोलणार आहोत असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. मुंबई महापालिकेमध्ये काल जो गोंधळ झाला त्यामध्ये ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि शिंदे गटाचे खासदार हे पाहायला मिळाले. मुळात या मंडळींचे मुंबई महापालिकेत काय काम होतं, असा सवाल जाधव यांनी केला. अशा प्रकारे कार्यालय ताब्यात घेऊन तुम्ही पक्ष मोठा करू पाहत आहात परंतु जनता सर्व गोष्टी पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांना वेळीच सावध व्हावे असेही जाधव यांनी म्हटले. 

Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस, अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार

Maharashtra Assembly Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आज 9 वा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Maharashtra Winter Session Live updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीभवनाला भेट देणार

CM Eknath Shinde: आज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधील  रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीभवनाला भेट देणार. त्यानंतर दीक्षाभूमी येथे जाणार 

पार्श्वभूमी

Maharashtra Winter Session Live Updates: महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session)आज 9 वा दिवस असून आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक पावित्र्यात असलेल्या विरोधकांकडून आजही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर, विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. 


बुधवारी पार पडलेल्या कामकाजात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 हे विधानसभेत बहुमताने संमत झाले. लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्रीदेखील असणार आहेत. 


कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचे पडसाद विधानसभेत उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या वक्तव्याचा निषेध विधानसभेत करण्यात आला. विरोधकांनी या मुद्यावरून कर्नाटक सरकारवर टीका केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  


विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज शुक्रवार, 30 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचे कामकाज समितीने जाहीर केले होते. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसात सरकारकडून आणखी काही महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी मांडण्यात येणार  असल्याची शक्यता आहे. तर, विरोधक या दोन दिवसात कसा पवित्रा घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. 


सत्तार यांनी आरोप फेटाळले


राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.  नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप केल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानसभेत दिली.  गायरान जमीन प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले होते. गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप सत्तारांवर केला होता. या आरोपाबाबत सत्तार यांनी विधानसभेत निवदेन सादर केले. कोणतेही नियमबाह्य काम झाले नसून कोर्टाचा निर्णय मान्य असेल असे त्यांनी सांगितले. अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून वाशीम जिल्ह्यातील 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.