Maharashtra Winter Session Live Updates: संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात; देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

Maharashtra Assembly Winter Session: आज विधीमंडळ अधिवेशनात सीमा प्रश्नी ठराव सादर होण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Dec 2022 05:43 PM
भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे आली एकत्र, सहकारी संस्थांच्या निवडणूक बिनविरोध

राज्याच्या राजकारणात भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे एकमेकांच्या विरोधात मैदानात असतात. मात्र, बारामती तालुक्यातल्या एका सहकारी संस्थांच्या निवडणूकीत तीनही पक्षांची दिलजमाई झाली आहे. या संस्थेच्या निवडणुकीत तीनही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध केलीय.

Maharashtra Assembly Winter Session : संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात; देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

राज्यात कोणत्याच महापुरुषांचा अपमान होणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी एक विधेयक आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसं पत्र देखील दिलं आहे. विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की उदयनराजे खरचं शिवजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे द्या. असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत आणि त्यांनी संजय राऊत यांना शिवाजी महाराज म्हणाल्या आहेत. आता त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराज यांच्याशी करणार का?  राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात, त्यावेळी कोणी काहीच बोलत नाहीत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केलाय. 

Maharashtra Assembly Winter Session: अमोल मिटकरी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली समज, पंतप्रधानांबाबत बोलणं अयोग्य

Maharashtra Assembly Winter Session:  अमोल मिटकरी तुमचं वागणं योग्य नाही. एकनाथ खडसे तुम्ही जेष्ठ सदस्य आहात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबाबत बोललात आम्ही काही बोलत नाही. पण पंतप्रधान यांच्याबाबत बोलणं सहन करणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना समज दिली.

Maharashtra Winter Session Live: पंढरपूर विकासाच्या मुद्यावर विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा

Maharashtra Winter Session Live: पंढरपूर विकासाच्या मुद्यावर विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा सुरू आहे. 

विधान परिषदेत अमोल मिटकरी यांनी वाचून दाखवलेल्या ट्वीटवरून गदारोळ, सभागृहाचे कामकाज स्थगित

Maharashtra Winter Session: विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुब्रम्हण्यम स्वामी यांचं एक ट्विट वाचून दाखवलं त्यावरून जोरदार गोंधळ झाला. त्या ट्विट मध्ये नरेंद्र मोदी यांचा रावण उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. 

Maharashtra Winter Assembly Session: कर्नाटक सरकारला अटकावं घालण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर राज्य सरकारने विचार करावा: उद्धव ठाकरे

Maharashtra Winter Assembly Session: भाषिक अत्याचाराचा प्रश्न आहे? सुप्रीम कोर्टच्या आदेशा नंतर जैसे थे परिस्थिती चे कर्नाटक पालन करत नाही. कर्नाटक सरकारला अटकावं घालण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर राज्य सरकारने विचार करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सीमावासियांच्या पाठिशी असल्याचे, पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन; उद्धव ठाकरे

Maharashra Winter Session: उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया: 


महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न कर्नाटक सरकारने चिथवला आहे 


देशाच्या गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले


राज्य सरकारचे अभिनंदन करतो,


आपण सीमावासियांच्या पाठिशी असल्याचे, पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन 

Maharashtra Assembly Session: विधान परिषदेचे काम काही वेळेसाठी स्थगित

Maharashtra Assembly Session: विधान परिषदेचे काम काही वेळेसाठी स्थगित

Maharashtra Assembly Session: बेळगाव सीमा प्रश्नीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Maharashtra Assembly Session: बेळगाव सीमा प्रश्नीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Winter Session Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमा प्रश्नी ठरावाचे वाचन

Winter Session Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमा प्रश्नी ठरावाचे वाचन


Winter Session: सीमाभाग ठरावात अनेक चुका, मराठीची तोडमोड करुन हा ठराव नको; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सूचना

Maharashtra Winter Session: विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सीमा प्रश्नी ठरावाच्या मुद्यावर सरकारला सूचना
- सीमाभाग ठरावात अनेक चुका आहेत
- आपण इंग्रजी माध्यमांचे आहेत
- यात अनेक वाक्य रचना चुकीच्या आहेत
- याचा संदर्भ उद्या कोर्टात ही उपस्थित केला जाऊ शकतो
- मराठीची तोडमोड करुन हा ठराव नको
- यात सुधारणा करण्यात यावा

Winter Session: कर्नाटक सीमा प्रश्नी एकमताने ठराव मंजूर करुयात; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आवाहन

Winter Session: कर्नाटक सीमा प्रश्नी एकमताने ठराव मंजूर करुयात; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आवाहन

Maharashtra Assembly Winter Session: कर्जत तालुक्यातील अनधिकृत खडीक्रशर प्रकरणी तहसीलदार आणि प्रांतअधिकारी निलंबित; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session:  कर्जत तालुक्यातील अनधिकृत खडीक्रशर प्रकरणी तहसीलदार आणि प्रांतअधिकारी निलंबित


अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृतपने उत्खनन सुरु असल्याचा आमदार राम शिंदे यांनी आरोप केल्यानंतर निलंबनाची कारवाई


महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची विधान परिषदेत घोषणा 


निलंबनाच्या करवाई नंतर विभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करत असल्याची देखील विखे- पाटील यांची सभागृहाला माहिती

Maharashtra Winter Session: मुंबईतील विधानसभेच्या मुख्य सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार

Maharashtra Winter Session: मुंबईतील विधानसभेच्या मुख्य सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभेत करण्यात आली.  शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी, 23 जानेवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत; शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरमधील शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा ठाकरे गटाचा आरोप

शिंदे-फडणवीस सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरमधील शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप  ठाकरे गटाने केला आहे. निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे. 

Maharashtra Winter Session: विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे, विरोधकांना बोलू दिले जात नाही; संजय राऊत यांचे टीकास्त्र

Maharashtra Winter Session: विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे. विधानसभेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. 

Maharashtra Winter Session: अधिवेशन संपले नाही, वाती तयार आहेत संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Winter Session: अधिवेशन संपले नाही, वाती तयार आहेत संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Winter Session Live: जालना जिल्हयातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Winter Session Live: जालना जिल्हयातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांना निलंबित करत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली. दोन वर्ष संबधीत अधिकाऱ्याची चौकशी सुरु होती. तत्कालीन सरकारने पाठीशी घातलं होत असा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचार आणि महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तवणूक या मुद्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Maharashtra Winter Session Live: काही मंत्र्यांच्या प्रकरणांची माहिती घेणे सुरू आहे. कागदपत्रे मिळाल्यानंतर सभागृहात सरकारला कोंडीत पकडणार; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Winter Session Live: काही मंत्र्यांच्या प्रकरणांची माहिती घेणे सुरू आहे. कागदपत्रे मिळाल्यानंतर सभागृहात सरकारला कोंडीत पकडणार; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Winter Session Live: भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवनात दाखल

BJP MLA In RSS Head Office Nagpur: भाजपचे सर्व आमदार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले आहे. या ठिकाणी सर्व आमदार संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. बळीराम केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करतील. त्यानंतर परिसरातच महर्षी व्यास सभागृहात आमदारांचे उद्बोधन वर्ग होणार आहे. सर्व आमदार आणि मंत्र्यांना आजची संघ भेट बंधनकारक करण्यात आली असून पक्षाने तसा आदेश काढण्याची माहिती आहे.


दरवर्षीच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या भाजप आमदारांना संघाच्या रेशीमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरात बोलावले जाते. संघाच्या कार्याविषयी आमदारांना माहिती देणे. तसेच जनतेच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत. लोकप्रतीनिधीचे सार्वजनिक जीवनातील आचरण कसे अपेक्षित आहे. या संदर्भात चर्चा केली जाते. 

पार्श्वभूमी

Maharashtra Winter Session Live: नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा सातवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर, सत्ताधारी आमदारांनी विरोधकांविरोधात आंदोलन करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सोमवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, दुसरीकडे आज सरकारकडून सीमा प्रश्नावर ठराव येण्याची शक्यता आहे. 


सीमा प्रश्नी विधीमंडळात ठराव


कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत विरोधी पक्षाकडून सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कर्नाटक सरकारविरोधात ठराव आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या सरकारने हा ठराव मंगळवारी सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 


कर्नाटकच्या विधीमंडळात 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्रच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकाच्या विधिमंडळात मांडला होता. 


अब्दुल सत्तार काय उत्तर देणार?


अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल (26 डिसेंबर)  सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपाला आज अब्दुल सत्तार हे सभागृहात उत्तर देणार आहेत.


यरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार  अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. त्याशिवाय, विरोधकांनी सिल्लोड कृषी महोत्सवाची तिकीट विकण्यासाठी सत्तारांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असल्याचा आरोप केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'वसुली भाई....सत्तार भाई' अशी घोषणाबाजी केली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.