Maharashtra Assembly Session : मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील 200 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करणार, मुख्यमंत्री शिंदेची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे.आजही विविध मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अधिवेशनातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Dec 2022 01:28 PM
नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप केलं, अब्दुल सत्तारांचे विधानसभेत निवेदन

Abdul Sattar : नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप केल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानसभेत दिली.  गायरान जमीन प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले होते. गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप सत्तारांवर केला होता. या आरोपाला सत्तार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. या प्रकरणावर सत्तार यांनी निवेदन दिले. दरम्यान, यावेळी विरोधकांनी सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं

Girish Gandhi: अधिवेशन गुंडाळून पाहुण्यांनी परत जावे : गिरीश गांधी...

Girish Gandhi:  राज्य व विदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जे काही सुरू आहे ते पाहता हे अधिवेशन गुंडाळावे आणि विदर्भात येणाऱ्या पाहुण्यांनी परत जावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांंनी एबीपी माझाशी बोलताना केले आहे. 

Winter Assembly Session: नागपुरचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारीच गुंडाळलं जाणार

Winter Assembly Session: नागपुरचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारीच गुंडाळलं जाणार आहे.  विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानं वाढवण्याची मागणी केली होती. मात्र विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. 

TET Exam: टीईटी घोटाळ्यावरून अजित पवारांचा मंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा

TET Exam:  कृषी महोत्सव आणि गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर विरोधकांनी टीईटीवरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सत्तारांचा बचाव करत अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं.. 

मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील 200 कोटींचा घोटाळ्याची चौकशी करणार, मुख्यमंत्री शिंदेची घोषणा

Koopar Hospital: मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील 200 कोटींचा घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली आहे. या घोटाळा प्रकरणातील ठाकरे परिवारातील जवळचा व्यक्ती आणि युवा सेनेच बडा पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.  शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढल्यानंतर आता शिंदे गटाकडून ठाकरे गटावर पलटवार करण्यात आला आहे.

आरोप झालेल्या मंत्र्यांची हकालपट्टी होणं गरजेचं, आदित्य ठाकरेंचा निशाणा

Aaditya Thackeray  : हे सरकार घटानाबाह्य आहे. या मंत्र्यांनी स्वत:ला खोके महाराष्ट्राला धोका दिला आहे. आरोप झालेल्या मंत्र्यांची हकालपट्टी होणं गरजेचं असल्याचं मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. 

Winter Session: नागपूरची संत्री भूखंड चोर मंत्री, विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी

Winter Session: विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनामासाठी घोषणाबाजी करत आहे.  रोहित पवार अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ आणि इतर आमदार घोषणाबाजी करत आहे. 


शेतकरी हैराण सत्तार खातो गायरान


दिल मांगे मोर मंत्री आहेत चोर


नागपूरची संत्री भूखंड चोर मंत्री

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

 पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.  काल सायंकाळी रवी भवन समोर झालेल्या वादात आमदार नितीन देशमुख यांनी एका पोलीस कर्मचारी हात उचलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

अजित पवार आणि जयंत पाटील अनिल देशमुख यांची भेट घेणार

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज माजी मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे आज दुपारी एक वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. अजित पवार हे सरकारी विमानानं मुंबईला जाणार आहेत. 

Bacchu Kadu:  ग्रामीण भागातील बेघरांसाठी आमदार बच्चू कडू मैदानात

Bacchu Kadu:  ग्रामीण भागातील बेघरांसाठी आता आमदार बच्चू कडू मैदानात उतरलेत.  शहरी भागातील नागरिकांप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एकसारखे निकष ठेवावेत... या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलंय.. कडूंनी चक्क तंबूत बसून आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

Ajit Pawar: अजित पवारांसाठी शिंदे सरकारचं विमान- सूत्र

Ajit Pawar: विरोधी पक्ष नेते  अजित पवारांना मुंबईला तातडीच्या कामासाठी जाण्यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  दुपारी 1 वाजता अजित पवार मुंबईला रवाना होणार आहे.  मुंबईत जेल मधुन सुटणाऱ्या अनिल देशमुख यांची देखील भेट होण्याची शक्यता आहे

Maharashtra Assembly Session : विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत चर्चेची शक्यता

Maharashtra Assembly Session : विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार आहे... या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य होणार याकडे आता लक्ष लागलंय.

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session 2022: आजचा आठवा दिवस आहे. आज देखील सभागृहात विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल (27 डिसेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उत्तर देणार होते. मात्र, सभागृहात ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळं आज तरी सत्तार मौन सोडणार का? आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडण करणार का? हे पाहणं महत्वाचं ठारणार आहे. मात्र, सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांना आक्रमक पवित्रा घेतला आहे.


विधीमंडळ अधिवेशनाचा सातवा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 7)


महापुरूषांच्या अपमानावरून विधान वरिषदेत सत्ताधारी आणि विरोधककांनी जोरदार गोंधळ घातला. दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचं विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केल्यानंतर त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा पाडाच वाचून दाखवला. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली


विधीमंडळ अधिवेशनाचा सहावा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 6)


आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. आज विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तर, राऊत यांचे बॉम्ब फुसके असल्याचे प्रतिहल्ला भाजपने केला होता. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई, सीमा प्रश्न, एनआयटी भूखंड प्रकरण आदी मुद्यांवर आजही विरोधक सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा पाचवा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 5)


महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याचे पडसाद आज विधानसभेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिवसभर आंदोलन होण्याची शक्यता आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा  चौथा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 4)


विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून NIT जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिसऱ्या दिवशी लावून धरली होती. विधान परिषदेत एनआयटीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आज विधीमंडळात आज विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विधीमंडळात 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.


विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस (Maharashtra Assembly Winter Session Day 3rd)


नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून निवदेन सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी असणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतवून लावण्यास सत्ताधाऱ्यांकडून रणनीति ठरवण्यात आली आहे. 


अधिवेशनाचा आज दुसरा दिवस


हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावरून आक्रमक होणार आहेत. सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक साडेदहा वाजता आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत तीनही पक्षांची स्ट्रॅटेजी ठरवली जाईल. श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर या विषयासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरती विरोधक आक्रमक होणार आहेत.


या मुद्यांवर विरोधक आक्रमक होणार?


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. 


महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.


23 विधेयके प्रस्तावित 


सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयके आहेत. तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयके आहेत. 


1. विधानसभा विधेयक -  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग), 


2. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग). 


3. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग). 


4. विधानसभा विधेयक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 , (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


5. विधानसभा विधेयक- . जे.एस.पी.एम. युनिव्हर्सिटी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग). 


6.  महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).


7. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योग, ऊर्जा व कामगार).


8. विधानपरिषद विधेयक - युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग). 


9. विधानपरिषद विधेयक -  पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).


10. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).


11. विधानसभा विधेयक - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)


12. विधानसभा विधेयक - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).  


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.