Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यावर ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य 'हातांचे' मी आभार मानत असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी केलं. एकनाथ शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्यांनी माझी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं असेही फडणवीस म्हणाले.
मी त्यांना माफ केलं
हे सरकार टीकणार नाही असे मी म्हणत होतो. कारण ही आघाडी अनैसर्गिक झाली होती. त्यावेळी मी म्हणाल होतो की मी पुन्हा येईल. त्यानंतर लोक माझी टिंगल टवाळी करत होते. काही जणांनी माझा अपमान केला. पण मी परत आलो, पण येताना यांनाही घेऊन आलो असे ते म्हणाले. एकटा नाही आलो मी यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल, टवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे असल्याचे फडणवीस म्हणाले. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं असे फडणवीस म्हणाले.
विरोधात असानाही आम्ही संघर्ष केला
राजकारणात काही गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है. 'दुनिया के सारे शौक पाले नही जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नही जाते'. असा शेअर देखील ते सभागृहात म्हणाले. आमच्याकडे बहुमत असताना आम्हाला विरोधात बसावे लागले. आम्ही सातत्यानं संघर्ष केला. जनतेचे प्रश्न मांडले. जनतेमध्ये राहिलो असेही फडणवीस म्हणाले.
सत्ता हे आमचं साध्यच नाही
काही लोकांना असे वाटायचे की आम्ही सत्तेसाठी काही करतो. पण आमचा विचार सांगतो की, सत्ता हे आमचं साध्यच नाही ते आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. मी सांगितले होते की ज्यावेळी सरकार जाऊल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ. आणचे नेते पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिलं की आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही. आमचं मत एवढच होत की जनतेनं आम्हाला कौल देऊनही
ते हिरावून नेण्याचा प्रयत्न केला. आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा सैनिकाला मुख्यमंत्री बनवू हे दाखवून दिलं. जनतेनं जे शिवसेना भाजपला कौल दिला त्याचा आम्ही सन्मान केल्याचे फडणवीस म्हणाले.
सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये असेही फडणवीस म्हणाले. प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की जो निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते. कोणीही असो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं कारण परत लोकांना उत्तर द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले. आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेनं काम करणार नाही. मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु असेही ते म्हणाले. या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.