= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सांगली जिल्हा बॅक भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार : सहकार मंत्री अतुल सावे सांगली जिल्हा बॅक भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार, विधानसभेत सहकार मंत्री अतुल सावे यांची घोषणा
सांगली जिलंहा बॅंके प्रकरणात २०२१ साली चौकशी आदेश सहकार विभागाने दिले पण अद्साप काहीच झाले नाही यावरून विधानसभेत संजय सावकारे, राम सातपुते, हरीभाऊ बागडे यांनी आक्रमक भूमिका धेतली.
या जिल्हा बॅंक चौकशी प्रकरणामुळ् काॅग्रेस एनसीपी नेत्यांची अडचण वाढणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर होणार कारवाई
- राज्य सरकारने केले स्पष्ट
- तारांकित प्रश्नावर दिले राज्य सरकारने लेखी उत्तर
- राज्यातील ३ हजार ३४६ वरीष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त १ हजार ९७३ वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहे
- मुंबई आणि पनवेल मधील ६६८ पैकी फक्त २७३ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहेत
- सर्वांत कमी नॅक मुल्यांकन प्राप्त महाविदयालय मुंबई आणि पनवेल मध्ये
- नॅक मुल्यांकन प्राप्त न केल्यास अनुदान, संलग्नता मंजूर करण्यात येणार नाही
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधिमंडळात राहुल गांधी यांच्या पोस्टर संदर्भात जे काही झालं त्याबाबत आजच निर्णय घ्यावा : अशोक चव्हाण Maharashtra Budget Session 2023 : विधिमंडळात राहुल गांधी यांच्या पोस्टर संदर्भात जे काही झालं त्याचा निर्णय तुम्ही आज देण्यात यावा, अशी विनंती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, विधिमंडळात जे काही घडलेला आहे त्या संदर्भात उपसभापती यांच्याशी चर्चा करून मी अंतिम निर्णय घेईल. कारण विधिमंडळातील हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळं त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल.
-
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ajit Pawar : राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधकांची मागणी Ajit Pawar : राष्ट्रीय नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला विधीमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी जोडे मारल्याची घटना घडली. ज्यांनी अशी कृती केली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला असे जोडे मारणे योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमच्याकडेही जोडे असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचे थोरात म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गेल्या सात वर्षापासून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न : रविंद्र धंगेकर Maharashtra Budget Session 2023 : गेल्या सात वर्षापासून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय यंत्रणेत भाजपचा हस्तक्षेप पाहायला मिळत आहे. पंतप्रधान इतर भाजप नेते हे लोकशाही हुकुमशाहीकडे नेत काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. लोकशाहीच्या चारही स्तंभावर दबाव टाकला जात आहे. राहुल गांधी कधीच माफी मागू शकत नाहीत असेही दंगेकर म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी सरकारची धावाधाव, सर्वपक्षीय गटनेत्यांची बोलावली बैठक Maharashtra Budget Session 2023 : लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी सरकारची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धावाधाव
सर्वपक्षीय गटनेत्यांची बोलावली बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार बैठक
बैठकीला दोन्ही सभागृहाचे गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती राहणार उपस्थित
विधानभवनात आज सकाळी साडेदहा वाजता बैठक
लोकपाल विधेयकावर विरोधकांची संमती मिळवण्यासाठी सरकारकडून फ्लोअर मॅनेजमेंट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करुन राहुल गांधींवर कारवाई, नाना पटोलंचा आरोप Maharashtra Budget Session 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.
मताचा व्यापार करण्यासाठी ओबीसीचा वापर
देशातील ओबीसी जनता मोदींसोबत राहणार नाही
काल विधान भवनात चुकीच घडलं
सरकार चुकीच केल्यास शिव्या घालू शकतात
रिझर्व्ह बॅंक खाली करुन ठेवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Eknath Shinde : देशातील जनता पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवेदन CM Eknath Shinde : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असला, तर देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Budget Session 2023 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे निरमा आंदोलन, नेत्यांच्या फोटोला घातली अंघोळ Maharashtra Budget Session 2023 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra Budget Session 2023) शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. आजच्या दिवशी विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षानं काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विरोधक देखील शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यावरुन आक्रमक झाले आहे. विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पत्रिकेवरून विधान परिषदेत मानपमान नाट्य, उपसभापतीसह विरोधी पक्षनेत्याचं नाव नाही Maharashtra Budget Session : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पत्रिकेवरून विधान परिषदेत मानपमान नाट्य रंगलं.
कार्यक्रमात जाऊन सरकार विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा विरोधकांचा इशारा.
उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे विरोधक सभागृहात आक्रमक.
विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृह पाऊण तास तहकूब.
आज आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणारं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Budget Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शनं, सरकार विरोधात घोषणा Maharashtra Budget Session : विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शन करत आहेत. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधक आंदोलन करत आहेत. गुजरातचा निरमा क्लीन चिट मिळवा अशा घोषणा विरोधक देत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेती प्रश्नासह विविध मुद्यांवरुन विरोधक आज आक्रमक होणार Maharashtra Budget Session : या अधिवेशनात विरोधकांनी शेती प्रश्नासह विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केली नाही. यावरुन देखील विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच वाढती महागाई, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच आज विधान परिषदेमध्येही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Budget Session : एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाराजी Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात व्यक्त केली नाराजी
- मुख्यमंत्री यांच्याकडे इतकी खाती आहेत की ते सगळ्यांना काम सांगतात
- उपमुख्यमंत्री यांनी तरी एका आठवड्यात पूर्ण वेळ दिला
- त्यांनी किती वेळ दिला आहे वरच्या सभागृहाला
- एक आवडती आणि एक नावडती असा प्रकार घडत आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धव ठाकरे-दिपक केसरकर एकत्र, मराठी भाषा भवनच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना Maharashtra Budget Session : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मराठी भाषा भवनासंदर्भात (Marathi Bhasha Bhavan) बैठक बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यासह मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. तसेच अन्य मंत्री देखील उपस्थित होते. केसरकर शिंदे गटात गेल्यानंतर प्रथमच दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे समोरा-समोर आल्याचे पाहायला मिळालं. महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेल्या आराखड्यात काहीही बदल करणार नसल्याचं दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Budget Session : विधानभवानात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्यानं हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकमेकांसोबत चर्चा करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मराठी भाषा भवनासंदर्भात बोलावली बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित Maharashtra Budget Session : विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मराठी भाषा भवनासंदर्भात बैठक बोलावली आहे.
मंत्री दीपक केसरकर काहीच वेळात येतील, त्यांनांतर बैठकीला सुरुवात होईल
या बैठकीला उद्धव ठाकरे, अंबादास दानवे अन्य विधिमंडळ सदस्य बैठकीला उपस्थित आहेत
गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात झाला होता वाद
उपसभापतींच्या दालनात झाला होता वाद
बंडखोरीबद्दल दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते
या प्रसंगानंतर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला दिलं होतं प्रत्युत्तर
या वादानंतर उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर मराठी भाषा भवनासंदर्भातील आयोजित बैठकीत एकमेकांसमोर पुन्हा येणार आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
थोड्याच वेळात काँग्रेस नेत्यांची बैठक, राहुल गांधींना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर नेते मुंबई काँग्रेस कार्यालयात दाखल Maharashtra Budget Session : काँग्रेस नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. राहुल गांधी यांना कोर्टाने शिक्षा सुनावली या प्रकरणी बैठक आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक होणार आहे. काँग्रेसचे नेते विधानभवनातून बैठकीला निघाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Budget Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने Maharashtra Budget Session : आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले.
राहुल गांधींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारल्याचे पाहायला मिळाले. परदेशात केलेल्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Budget Session : दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक Maharashtra Budget Session : आज दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक
बैठकीत सभागृहातील रणनीती यासोबतच आगामी सभांसंदर्भात चर्चा होणार
बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
6 ते 10 एप्रिलला आमचा अयोध्या दौरा होणार, आमदार भरत गोगावले यांची माहिती Bharat Gogawale : 6 ते 10 एप्रिलला आमचा अयोध्या दौरा होणार आहे. 6 तारखेला हनुमान जयंती आहे. त्या वेळी आमचा दौरा आम्ही पुर्ण करु असे मत शिवसेना आमदार (शिंदे गट) भरत गोगावले यांनी व्यक्त केले. आम्ही सगळ्यांना घेऊन जाणार आहोत. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर एकत्र जायचं आमचं ठरल होतं. त्यानुसार आम्ही जात आहोत. आम्ही जे बोललो त्यानुसार वागत असल्याचे गोगावले म्हणाले. आम्ही धनुष्यबाण सांभाळत आहोत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आज विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधक सत्ताधारी आमने-सामने येणार Maharashtra Budget Session : आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण नुकतेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आहे. आता यावरुन देशभरात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरून संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाला असून, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. यावर काँग्रेसच्या वतीनं नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का?अशा पद्धतीचा करण्यात आलं आहे. यावरुनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्ष राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळेल तर दुसरीकडे विरोधक देखील राज्यातील अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या ठिकाणी अपूर्ण राहिलेले पंचनामे आणि शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, गुढीपाडवा उलटून गेला तरी आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी न मिळाल्याच्या मुद्यावरुन विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.