Maharashtra  Budget Session Live : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील शेवटचा दिवस

Maharashtra assembly budget session : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज शेवटचा दिवस आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Mar 2023 01:05 PM
Budget Session 2023 : शेतकरी मुद्यावरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणाबाजी 

Maharashtra Budget Session 2023 : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज (17 मार्च) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आजही आंदोलन सुरु केलं आहे. 'खोके सरकारचा उपयोग काय शेतकऱ्यांना न्याय नाय' अशा घोषणा विरोधक देत आहेत.

Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला, विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात कबुली

Shashikant Warise Death Case : पत्रकार  शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची कबुली सरकारनं कबुली दिली आहे. विधान परिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारच्या वतीनं लेखी उत्तर देण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटीची (SIT) चौकशी सुरु असल्याची देखील माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे.

लक्षवेधी लागली की संबंधित विषयाशी निगडित व्यक्ती आमदांमार्फत अधिवेशन सुरु असताना विधानभवन परिसरात येतात : निलम गोऱ्हे

Maharashtra Budget Session 2023 : सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित विषयाशी निगडित व्यक्ती आमदांमार्फत अधिवेशन सुरु असताना विधानभवन परिसरात येतात. आमदारांसोबत माझी भेट घेण्याचा प्रयत्न करतात. हे असं होणं योग्य नाही. इथून पुढे अशाप्रकारे कुणीही आलेलं चालणार नाही. एकंदरितच लक्षवेधी लागू नये यासाठी गळ घातली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे चालणार नाही याच उदाहरण म्हणजे नुकतच खासगी सावकार प्रकरणात एक आमदार ज्या सावकाराविरोधात लक्षवेधी लागली होती. त्यांना घेऊन माझ्या दालनात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यासोबत संबंधित प्रकरणाचा अधिकारी देखील उपस्थित होता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, सभागृहात विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला आहे. या पावसामुळं शेती पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. शेतकरी जगला तर राज्य जगेल. त्यानुसार सरकारनं काम करावं असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. 

एच3 एन 2 साठी आम्ही सजग, सर्वे करायला सुरुवात : तानाजी सावंत

Maharashtra  Budget Session 2023 : एच3 एन 2 साठी आम्ही सजग अहोत. मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली आहे. आता आम्ही सर्वे करायला सुरुवात केली असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले. खासगी आणि सरकारी रुग्णालयांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संशियत रुग्ण सापडले तर विलगीकरण करण्याबाबत देखील सांगण्यात आलं आहे. मास्क वापरा, हात धुणे या बाबी करणं गरजेचं आहे.

विधान परीषद उपसभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी मिळून विधीमंडळ परिसरातील कामकाजाबाबत निर्णय घ्यावेत : शशिकांत शिंदे

Maharashtra  Budget Session 2023 :  विधान परीषद उपसभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी मिळून विधीमंडळ परिसरातील कामकाजाबाबत निर्णय घ्यावेत असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. आज नविन पायंडा पाडण्यात आला आहे की, विधीमंडळात येण्यासाठी जे पास देण्यात येत आहेत त्याबाबत उपसभापतींना यांना पास देण्याबाबत अधीकार देण्यात आले नसल्याचं निदर्शनास आलं आहे. आम्हाला असं सांगण्यात आलं की जे उपसभापतींना पास दिले जात आहेत. त्याची माहिती विधानसभा अध्यक्ष यांना देण्यात यावी असे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. हे चुकीचं आहे. राज्यात चुकीचा पायंडा पडू शकतो. दोन्ही सभागृह एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करु शकत नाही. एकमेकांवर आपण अतिक्रमण करू शकत नाही.

गॅस दर वाढीसह शेतकरी प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Maharashtra  Budget Session 2023 :  अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. आज देखील विरोधक विविध प्रश्नांवरुन आक्रमक झाले आहेत. विधानभवनच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज प्रतिकात्मक चूल बनवत गॅस दर वाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच बजेट म्हणजे फसवणूक अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस, विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता

Maharashtra  Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना विधानभवन हक्कभंग समितीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर आता आज विधानपरिषद हक्क भंग समितीच्या वतीने देखील नोटीस पाठवण्यात येणार आहे. यासाठी सकाळी साडेअकरा वाजता हक्कभंग समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवण्यात येईल.

पुढच्या वेळेस अर्थसंकल्पाच्या आधी अॅक्शन टेकन रिपोर्ट मांडणार : फडणवीस

Maharashtra  Budget Session 2023 : महाविकास आघाडीने एवढ्या घोषणा केल्या, त्या तर कुठे पुर्ण झाल्या आहेत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्यासंदर्भात घोषणा केल्या मात्र आम्ही त्या पुर्ण केल्या.
पुढच्या वेळेस अर्थसंकल्पाच्या आधी अॅक्शन टेकन रिपोर्ट मांडणार
ज्यात मागील अधिवेशनात किती घोषणा झाल्या आणि किती पुर्ण झाल्या

Ajit Pawar : विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, अजित पवार संतापले, फडणवीसांची दिलगिरी 

Ajit Pawar : आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळं सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले. मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन (Minister Absent) जोरदार टीका केली. हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चालल्याचे अजित पवार म्हणाले. सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

Maharashtra  Budget Session 2023 : विधानसभेत सात मंत्री अनुपस्थित, विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ

Maharashtra  Budget Session 2023 : विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ


सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी


मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थितीत का राहतात? भाजप आमदार कालिदास कोळमकर यांचा सरकारला घरचा आहेर


सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र शब्दात नाराजी


सभागृहात उपस्थित सदस्यांची जी भावना आहे तीच नाराजीची भावना आपली देखील असल्यास तालिका अध्यक्षांचे मत

काल सभागृहात आवाज उठवला, आज रस्त्यावर उतरणार : आमदार विनोद निकोले

Maharashtra  Budget Session 2023 : वन हक्क दावे, सातबारा, आशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते ही शोकांतिका असल्याचे मत आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केले. कालच बैठक होणे अपेक्षित होते, पण झाली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या संदर्भात आवाज उठवला होता. काल आम्ही सभागृहात आवाज उठवला आज रस्त्यावर उतरणार आहोत असे निकोले म्हणाले. अधिवेशन सुरू आहे तरीही मी मोर्चात सहभागी होणार आहे. सरकारसोबत आज चर्चा होणार आहे. सरकारनं सकारात्मक विचार करावा. समाधान झाले नाही तर पालघर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचे निकोले म्हणाले. 

सुधारित महिला धोरणावर विधीमंडळात बैठक सुरु, पक्षीय महिला आमदारांची उपस्थिती

सुधारित महिला धोरणावर विधीमंडळात बैठक सुरु


महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय महिला आमदारांची बैठक


विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समिती कक्षात बैठक सुरु


धोरणात नेमके काय असणार? याचे शासनाकडून सादरीकरण


सर्वपक्षीय महिला आमदारांची मते लक्षात घेणार

लव्ह जिहादच्या मुद्यावरुन अबू अझमी आणि नितेश राणे आमने-सामने

Maharashtra  Budget Session 2023 : लव्ह जिहादच्या मुद्यावरुन समाजवादी पार्टीचे आमदार अबू अझमी आणि भाजप आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत. 

जुन्या पेन्शनच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक, 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब

Maharashtra  Budget Session 2023 :  जुन्या पेन्शनच्या मुद्यावरुन विरोधक विधानपरिषदेत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळं 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं आहे. 

अमुलसारख्या कंपन्या आपल्या डोक्यावर बसवण्याचं काम सुरु : आंबादास दानवे

Maharashtra  Budget Session 2023 : गुजरातमधील अमुलसारख्या कंपन्या आपल्या डोक्यावर बसवण्याचं काम सुरू आहे. महानंदा हे याचं उदाहरण आहे. अजुनही सरकारने जे 900 कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत, याबाबत काहीही केलेलं नाही. आम्ही कंपनी जाऊ देणार नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे म्हणाले. 19 प्रकल्प पूर्ण करणार असं सरकारने सांगितलं. मात्र, अजून काहीचं केलेलं नाही. 

Nitin Deshmukh : मतदारसंघातील पाण्याच्या योजनेला स्थगिती, आमदार नितीन देशमुख यांचे आंदोलन

नितीन देशमुख, आमदार


आजपासून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरु.


 माझ्या मतदार संघात खार पाणी आहे
- त्यासाठी पाण्याची योजना आणली होती
- मात्र या सरकारने या योजनेला स्थगीती दिली आहे
- अर्धी योजना पुर्ण झालेली आहे.
- आमच्या मागे काय ईडी, सीबीआय, अँन्टी करप्शन लावायचं ते लावा पण मतदारसंघातील जनतेला त्रास का देता? असा सवाल आमदार नितीश देशमुखांनी उपस्थित केलाय.
-

महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी : नाना पटोले

Maharashtra  Budget Session : महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. अवकाळी पावसामुळं झालेले नुकसान, मोबदला असेल, घोषणा केली जाते पण शेतकऱ्याला मदत केली जात नाही. त्यामुळं नाशिकपासून मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचा पायी मोर्चा  निघाला आहे.  
जुन्या पेन्शनबाबत 20 लाख कर्मचारी संपवार गेले आहेत. राज्यातलं आणि दिल्लीतलं मोदी सरकार हे फक्त उद्योजकांचा सरकार असल्याचे पटोले म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे. 20 लाख कर्मचारी संपावर गेल्यामुळं प्रशासन व्यवस्था संपूर्ण ठप्प झाली आहे. आज सरकारने हा संप वापस जाण्यासाठी कार्यवाही करावी निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानसभा सभागृहाचे कालचे कामकाज सव्वा दहा वाजता संपले. आज (शुक्रवार 17 मार्च ) सकाळी साडेनऊ ते पावने अकरा वाजेपर्यंत विशेष बैठक आयोजीक करण्यात आली आहे. या बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. तर नियमित कामकाज अकरा वाजता सुरू होईल. 


 


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना विधानभवन हक्कभंग समितीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर आता आज विधानपरिषद हक्क भंग समितीच्या वतीने देखील नोटीस पाठवण्यात येणार आहे. यासाठी सकाळी साडेअकरा वाजता हक्कभंग समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवण्यात येईल.


सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांवरुन विरोधक आजही सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा, शेतकऱ्यांचा लाँग मार्च या मुद्यावरुन विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. 


काल सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय आदेशवरती चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. चर्चेदरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 


आयुष्यभर लोकं काम करतात, त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे : थोरात 
 
आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे. आयुष्यभर लोकं काम करतात त्यामुळं त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे असे थोरात म्हणाले. सरकारनं गांभीर्यानं या आंदोलनाकडं पाहिलं पाहिजे. तसेच नाशिकवरुन शेतकरी पायी चालत आले आहेत. त्यांच्या समस्या आहेत म्हणूनचते चालत आले आहे. त्यावर सरकारनं तोडगा काढावा असे थोरात म्हणाले. किसान सभेचा लाँग मार्चला आमदार विनोद निकोले आणि किरण लहामटे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी विधान भावनात निदर्शने करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. 


अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी 


शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो...अब्दुल सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या...अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या. अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.