Maharashtra Budget Session Live : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली
Maharashtra assembly budget session 2023 : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 Mar 2023 11:28 AM
पार्श्वभूमी
Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती...More
Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होमार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.अवकाळीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होणार अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज विधानसभेत चर्चा होणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली आहे. सध्या अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरु आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षांचे नेते विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. गॅस दरवाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागण्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
Ajit Pawar : शेतकऱ्यांनी नवीन वर्ष साजरं करायच कसं? अद्याप नकुसानीचे पंचनामे नाहीत, अजित पवारांचा संतापले
Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायच? असा सवालही अजित पवारांनी केली.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली, सभापतींना पत्र
Maharashtra Budget Session : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आमदार पदाची पेन्शन नाकारली आहे. याबाबत आमदार म्हात्रेंनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र लिहलं आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्यामुळं आपण पेन्शन नाकारत असल्याचा पत्रात उल्लेख आहे.
Budget Session : 'खोक्यांची पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2023) आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन झाल्याचे पाहयला मिळालं. कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली. मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) येताच विरोधकांनी 'खोक्यांची पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', 'ईडी पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' अशी घोषणाबाजी केली.
Ambadas Danve : सरकारचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष, मंत्री सभा घेण्यात व्यस्त; अवकाळीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Ambadas Danve : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नकुसान झालं आहे. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना सरकारचे मंत्री मात्र सभा घेण्यात व्यस्त आहेत. त्याचं शेतकऱ्यांकडे थोडेही लक्ष नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.