Maharashtra Budget Session LIVE: राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे.

abp majha web team Last Updated: 10 Mar 2023 01:16 PM
Maharashtra budget session 2023 :  राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती

Maharashtra budget session 2023 :  एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे, मुख्यप्रतोदपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधान परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

Maharashtra budget session 2023 : रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार : मुख्यमंत्री

Maharashtra budget session 2023 : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. जात विचारून खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काल ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे त्यामुळं विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळं त्यांची परिस्थिती समजून घ्या असे मुख्यमंत्री म्हणाले.


 

शेतकऱ्यांना जात नसते, पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार


- सांगली जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना खत घ्यायचे असेल तर त्यांना पहिलं जात सांगावी लागत आहे.
- शेतकऱ्यांना जात नसते 
- शेतकऱ्यांमध्ये संताप आहे
- जातीचा रकाना भरल्याशिवाय फाॅर्म भरला जात नाही
- पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही
- यावरती संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या, शेतकऱ्यांची नाराजी

Farmer Caste Query For Buying Fertilizer : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे. 








 






 











Maharashtra budget session 2023 : विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन, राष्ट्रवादीचे आमदार भोपळा घेऊन विधानभवनात

Maharashtra budget session 2023 :  विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा घेऊन विधान भवनात प्रवेश करत आहेत. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. 

Maharashtra budget : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेतलीय : सतेज पाटील

Maharashtra budget session 2023 : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेतली असल्याची टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांन केली. त्यांनी प्रवर्गाची तरतूद केली आहे. मागच्या दाराने लोकांचा डेटा गोळा करणे सूरू आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा डेटा निवडणुकीत वापरण्यासाठी असा प्रकार तर सूरू नाही ना अशी शंका मनात येत आहे.

Budget session : आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार

Maharashtra budget session 2023 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 

Maharashtra Economic Survey :  राज्याच्या कृषी (Agriculture News) आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज
Maharashtra Economic Survey : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर, राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ अपेक्षीत

Maharashtra Economic Survey : महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) जाहीर करण्यात आला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच  राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. 

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान, तत्काळ मदत करावी : अंबादास दानवे

Maharashtra Budget Session : अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झाल्यानं आणि पावसामुळं उरलेल्या पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोर जाण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यातील एका गावाने चक्क गाव विकायाला काढलं आहे. एकिकडे सुलतानी संकट असताना आता आसमानी संकट देखील आलं आहे. अजूनही पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. 

ज्यांनी बीडमध्ये देवस्थानच्या जमिनी हडप केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? जयंत पाटलांचा सवाल

जयंत पाटील


बीडमध्ये देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न झाला.
त्याच्यावरती काय कारवाई करणार आणि ज्या तक्रारदाराने अर्ज केला त्याला धमकी दिली जाते 
ज्यांनी हडपली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. 


देवेंद्र फडणवीस


या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय.
हा प्रकार गंभीर आहे 
जमिनी हडपण्याचं रँकेट उघडकीस आलंय 
या प्रकरणात चार महिन्यात प्राथमिक तपास पूर्ण करणार

Maharashtra Budget Session:  उद्धव ठाकरे आज विधानभवनात येणार, महाविकास आघाडीची बैठक

Maharashtra Budget Session:  उद्धव ठाकरे आज विधानभवनात येणार आहेत. दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे विधानभवनात येणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडींच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत.

Maharashtra Budget Session: आमदार नमिता मुंदडा त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन सभागृहात

Maharashtra Budget Session: केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन सभागृहात आल्या आहेत. महिलांसाठी राखीव आजचा दिवस ठेवण्यात आला आहे. प्रत्येक अधिवेशनात 2 दिवस राखीव महिलांसाठी ठेवावेत अशी मागणी मुंदडा यांनी केली. मी पहिल्यांदा हिरकणी कक्ष पाहिला आहे. सुरुवातीला त्याची व्यवस्था ठिक नव्हती. आता मात्र, हा कक्ष व्यवस्थित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी माझी मागणी लक्षवेधी लावून करणार असल्याचे मुंदडा म्हणाल्या. 

Maharashtra Budget Session: विधीमंडळाच्या पाऱ्यावर विरोधकांचं आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी; शेतकऱ्यांना मदतीची मागणी

Maharashtra Budget Session: विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन सुरु झालं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पाऱ्यावर विरोधकांच्या वतीनं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 

जागतिक महिला दिनानिमित्त विधानभवनामध्ये येणाऱ्या  महिलांना उपसभापती कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा

Maharashtra Budget Session: जागतिक महिला दिनानिमित्ताने विधानभवनामध्ये येणाऱ्या  महिला आमदार, महिला पत्रकार आणि कर्मचारी यांना उपसभापती यांच्या कार्यालयाच्या वतीने शुभेच्छापत्र, फुल आणि  चॉकलेट देत  शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Budget Session :  विधीमंडळात घुमणार आज महिला आवाज, विधानसभेत महिला 'लक्षवेधी'

Maharashtra Budget Session: जागतिक महिला दिनाचं (International Women's Day) औचित्य साधत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडतील. 








विधानसभा (Assembly) कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. आणि यामध्ये यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), देवयानी फरांदे (Devayani Farande), भारती लव्हेकर (Bharati Lavekar), मंदा म्हात्रे (Manda Mhatre), श्वेता महाले (Shweta Mahale), यामिनी जाधव (Yamini Jadhav), जयश्री जाधव (Jayashree Jadhav), सरोज अहिरे (Saroj Ahire) यांचा समावेश आहे. महिला आमदारांच्या योग्य सूचनांचा समावेश करून ते धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच सरकार कोसळलं होतं. 






Budget Session: शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होणार

Maharashtra Budget Session: अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा सुरु होत आहे. आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवलीजात आहे. शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होणार आहेत. 


 

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session LIVE: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 


आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) दुसरा आठवडा सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा  (Rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची विरोधकांची मागणी 


राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. सकाळी पायऱ्यांवर देखील विरोधक घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. कांदा, कोथिंबीर, मेथी, कापूस, सोयाबीन या  शेतमालाला भाव नाही. अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कमी दरानं खरेदी केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधक करतायेत. 


महाराष्ट्राचे आर्थिक धोरण जाहीर केलं जाणार


दरम्यान, आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरुन स्पष्ट होईल. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  


देवेंद्र फडणवीस प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार 


वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.