Maharashtra Budget Session LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, विरोधक आक्रमक

Maharashtra assembly budget session: विधीमंडळ अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Mar 2023 05:36 PM
विप्लव बजोरिया प्रतोदपदी नियुक्ती प्रकरण : उपसभापती कार्यालयाकडून शिंदे गट आणि ठाकरे गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागविण्यात येणार 

विप्लव बजोरिया प्रतोदपदी नियुक्ती प्रकरण 


उपसभापती कार्यालयाकडून शिंदे गट आणि ठाकरे गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागविण्यात येणार 


तपशीलात दोन्हीं गटांनी त्यांचे प्रतोद नेमताना बैठक कुठे घेतली, प्रतोद पदासाठी सूचक, अनुमोदक कोण होते व बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठराव मागविण्यात येणार- सूत्र 


अशा प्रकरच्या नियुक्तीस भविष्यात कोर्टात अहवान दिल्यास या तपशिलांच्या आधारे कोर्ट निर्णय घेत असल्यामुळे सर्व तपशील मागविण्यात येत असल्याची "एबीपी माझा"ला सूत्रांची माहिती

विप्लव बजोरिया प्रतोदपदी नियुक्ती प्रकरण उपसभापती कार्यालयाकडून शिंदे गट आणि ठाकरे गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागविण्यात येणार 

विप्लव बजोरिया प्रतोदपदी नियुक्ती प्रकरण 


उपसभापती कार्यालयाकडून शिंदे गट आणि ठाकरे गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागविण्यात येणार 


तपशीलात दोन्हीं गटांनी त्यांचे प्रतोद नेमताना बैठक कुठे घेतली, प्रतोद पदासाठी सूचक, अनुमोदक कोण होते व बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठराव मागविण्यात येणार- सूत्र 


अशा प्रकरच्या नियुक्तीस भविष्यात कोर्टात अहवान दिल्यास या तपशिलांच्या आधारे कोर्ट निर्णय घेत असल्यामुळे सर्व तपशील मागविण्यात येत असल्याची "एबीपी माझा"ला सूत्रांची माहिती

आम्ही घटनेनुसार आम्ही सरकार स्थापन केलं : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


घटनेनुसार आम्ही सरकार स्थापन केलं आहे
- या देशात घटना आहे
- लोकशाही प्रमाणे आम्ही काम करत आहेत
- एकही चुकीच काम करत नाही
- बाकीचे काय बोलतात त्यावर आम्ही बोलत पण नाही
-कालच्या निवडणूक संदर्भातही तुम्ही बोलला
- मी तर खुलेआम फिरलो
- तुमच्यासाठी पवारसाहेबांनीही सभा घेतल्या
- अजितदादा तुम्ही गाड्या बदलून फिरत होते
- त्याचे फोटो ही आमच्याकडे आहेत
- ज्या चुका झाल्या त्या सुधारु आम्ही 
- पण चिंचवडमध्ये काय झाल
- तीन राज्यात काय झाल तुम्हाला माहीत आहे
- भारत जोडो केला आणि तीन राज्य हरले
- आठवले यांच्या पक्षाचे आमदार निवडून आले
- पोटनिवडणूक हारतात आणि सगळ राज्य जिंकतात
- दादा तुम्ही शपथ घेतल्यानंतर तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो
- महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली.
- तोपर्यंत त्यांना सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
- अधिसंख्य पद निर्माण करायला कोणी तयार नव्हते.
- तो निर्णय आम्ही घेतला

160 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाना

CM Eknath Shinde : आम्ही ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत केला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 262 कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत.


बाळासाहेब ठाकरे दवाखाना 160 ठिकाणी सुरू केला


500 ठिकाणी आपण दवाखाना सुरू करत आहोत
माता सुरक्षित बालक योजना आपण योजना सुरू केले


समृद्धी महामार्ग आपण खुला केला


हाय गेमचेंजर प्रकल्प आहे

प्रत्येक जिल्ह्यात आता कौटुंबिक न्यायालयची गरज : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Budget 2023: प्रत्येक जिल्ह्यात आता कौटुंबिक न्यायालयची गरज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. ही अत्याधुनिक कौटुंबिक न्यायालाय असणार आहेत. 10 लाख लोकंसंख्येमागे एक न्यायालय असायला हवे असेही फडणवीस म्हणाले. 


 


 

विधानसभा विशेष अधिकार समितीची बैठक संपली, राऊतांनी लेखी उत्तर दिले नाही तर स्मरण पत्र पाठवलं जाणार

Maharashtra Assembly Budget 2023: विधानसभा विशेष अधिकार समितीची बैठक आज संपन्न झाली


या बैठकीत समितीने हक्कभंग नोटीस प्रस्तावाची माहिती घेतली


आता पुढील बैठक 9 मार्चला होणार आहे


विधीमंडळ सचिवांनी संजय राऊत यांना लेखी म्हणणं मांडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती


या नोटीसची मुदत आज विधानसभा कामकाज संपेपर्यंत असेल


तोपर्यंत लेखी उत्तर दिले नाही, तर राऊतांना पुन्हा स्मरण पत्र (रिमाईंडर नोटीस) पाठवली जाईल


यानंतर 9 मार्चच्या बैठकीत राऊत यांना म्हणण मांडण्यास अधिक मुदत द्यायची की नाही यावर निर्णय होऊ शकतो


विशेष अधिकार समितीकडे मुदत वाढ देण्यासंदर्भात सर्वस्वी निर्णय असतात

Maharashtra Assembly Budget 2023:  अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग, विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

Maharashtra Assembly Budget 2023:  अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला आहे. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरु केलं आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस

Budget Session : अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत. दरम्यान, मागील चार दिवसात विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरुन  विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Assembly Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस, राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत. यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे.  तर  अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. सभागृाहच्या पायऱ्यांवर सध्या विरोधक एकवटले आहेत.  त्यांची निदर्शनं सुरू आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाबाहेर आणि सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Assembly Budget 2023: विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

Maharashtra Assembly Budget 2023: विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा, मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार उत्तर. 

Mahavikas Aghadhi: महाविकास आघाडीच्या बैठकीला विधानभवनात सुरुवात

Mahavikas Aghadhi: महाविकास आघाडीच्या बैठकीला विधान भवनात सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात अजय चौधरी, अंबादास दानवे, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. आज दिवसभरातील कामकाजबाबात आणि विरोधी पक्षाच्या रणनीती बाबत बैठकीत चर्चा होण्याची  शक्यता आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिवसभर विरोधक आक्रमक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक, पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी.

Maharashtra Budget 2023: सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त... शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो... कांद्याला भाव मिळालाच पाहिजे... कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला 

Maharashtra Assembly Budget 2023:  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

Maharashtra Assembly Budget 2023:  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.  

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या नेत्यांची 10 वाजता बैठक, आजच्या सभागृहातील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज 10 वाजता बैठक करणार आहे.  आजच्या सभागृहातील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.  अजित पवारांच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आली आहे

Vidhan Parishad: विधान परिषदेचं आजच्या दिवसभराच कामकाज संपलं

Vidhan Parishad: विधान परिषदेचं आजच्या दिवसभराच कामकाज संपलं आहे.  उद्या दुपारी 12 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. 

Milind Narvekar: आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात

Milind Narvekar: आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले आहेत. आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. मात्र प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सभागृहात बसलो असे स्पष्टीकरण  नार्वेकर यांनी दिले आहे. 

Milind Narvekar:  मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले

Milind Narvekar:  मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी सभागृहात येऊन बसले. सुरक्षारक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होत आहे आदित्य ठाकरेंनी नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते उठून बाहेर गेले

Budget 2023:  राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सुरू

Budget 2023:  राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सुरू झाले आहे.  


Ajit Pawar: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

Ajit Pawar: विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांसोबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली.


 





 Budget 2023:  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

 Budget 2023:  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.  काल विरोधकांनी चहापानावर टाकलेल्या बहिष्कारांनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेचे जोरदार वाग्बाण चालले. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणा

Shiv Sena:  शिवसेनेच्या व्हिपवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता

Shiv Sena:  शिवसेनेच्या व्हिपवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे.  काल शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आमदारांना व्हिप जारी केला होता. व्हिप न  पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करू असा इशाराही दिला होता. मात्र शिवसेनेचा व्हिप मिळाला नाही आणि मिळाला तरी पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता काँग्रेसची आणि ठाकरे गटाच्या आमदारांची आपापल्या पक्ष कार्यालयात बैठक

Congress, Thackeray Group Meeting : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता काँग्रेसची आणि ठाकरे गटाच्या आमदारांची आपापल्या पक्ष कार्यालयात बैठक


संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष सभागृहातील रणनीती बैठकीत ठरवणार


ढासळलेले कांद्याचे दर, सरकारकडून जाहिरातींवर होणारा वारेमाप खर्च, राज्याबाहेर गेलेले उद्योग यावरुन सरकारला लक्ष केलं जाणार


'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती

Ajit Pawar: अजित पवारांच्या दालनात आज विरोधी पक्षाची बैठक, विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती

Ajit Pawar: राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक

Mantrimandal:  मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात मंत्र्यांकडे अतिरिक्त भार

Mantrimandal:  मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात मंत्र्यांकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. मूळ विभागासह अतिरिक्त  विभागांचं कामकाजही मंत्र्यांना पाहावं लागणार आहे. 

Shiv Sena:  शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आमदारांना व्हिप

Shiv Sena:  शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आमदारांना व्हिप बजावला आहे. ठाकरेंच्या आमदारांनाही शिवसेनेकडून व्हिप बजावण्यात आले आहे. व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यांत कारवाई करु, असा इशारा भरत गोगावलेंनी दिला आहे,  

Budget 2023:  शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात

Budget 2023:  शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार आहेय  देवेंद्र फडणवीस 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार  आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Budget Session : अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत. दरम्यान, मागील चार दिवसात विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरुन  विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे.


राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या आठवड्यात शिंदे गटाकडून युक्तीवाद होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दिले आहे. त्याचे पडसादही या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पडण्याची शक्यता आहे.  शिंदे-ठाकरे गटात या मुद्यावरून जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिव़डणूक यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.


हे मुद्दे गाजणार?


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे संकेत दिले आहेत. 


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 


जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे अशक्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ विधान परिषदेत निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक संकेत दिले होते. 


फडणवीस सादर करणार पहिल्यांदाच अर्थसंकल्प


वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.