= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याची चौकशी करायची असेल तर करा : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात आधी फाशी नको आम्हीही म्हटलं आधी तुम्ही त्यांना पदावरुन हटवा, त्यात आम्ही यशस्वी झालो. माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याबाबत चौकशी करायची असेल तर करा, माझी हरकत नाही : देवेंद्र फडणवीस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सचिन वाझे यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत : देवेंद्र फडणवीस सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? : देवेंद्र फडणवीस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सरकारने शेतकरी, नागरिकांना विजेचा शॉक दिला : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार म्हणजे ठाकरे सरकार. वीज तोडणी स्थगितीचा निर्णय मागे घेऊन सरकारने शेतकरी, नागरिकांना विजेचा शॉक दिला : देवेंद्र फडणवीस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कांजूरमार्गला कारशेड करणं भविष्याच्या दृष्टीने हिताचं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडचा विषय कोर्टात आहे. कांजूरमार्गला कारशेड करणं भविष्याच्या दृष्टीने हिताचं आहे. आता जागा प्रस्तावित आहे तिथे कारशेड करत आहोत. कोर्टात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कारशेड केलं तर तीन लाईन कारशेड मिळेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाणार रिफायनरीवरुन आम्ही भूमिका बदललेली नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार रिफायनरीवरुन आम्ही भूमिका बदललेली नाही. स्थानिक जनतेचा विरोध होता. आम्ही जनतेला बांधील आहोत, जनतेचा विरोध आहे. तेव्हाच भूमिका जाहीर केली. नाणार व्यतिरिक्त दुसऱ्या जागेला स्थानिक लोकांनी पाठिंबा दिली तर तिथे होईल. हित म्हणजे पैसे नाही पर्यावरण विषय आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
...म्हणून सचिन वाझे यांची बदली केली : उपमुख्यमंत्री अजित पवार सचिन वाझे यांची बदली केली याविषयी अजित पवार म्हणाले की, "सचिन वाझे यांना बाजूला केल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असं आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे सचिन वाझे यांची बदली केल्याचं वरच्या सभागृहात जाहीर करा, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितलं. मग सभागृहाचं कामकाज सुरु झालं."
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिरण यांच्या मृत्यूची दखल घेतली आहे, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेण्याचं काम सरकारचं आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोटमध्ये नावं आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं चारित्र्यहनन करायचं हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावर हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाईलाजाने सरकारला वीज तोडणी स्थगितीचा निर्णय मागे घ्यावा लागला : उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिवेशन दहा दिवसांचं होतं. ऊर्जामंत्री बाहेर गेले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. ती कंपनी कशी चालणार असा प्रश्न आहे. 30 हजार कोटी माफी दिली. आज नाईलाजास्तव सरकारला वीज बिल तोडणीचा निर्णय घ्यावा लागला : उपमुख्यमंत्री अजित पवार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झालं : मुख्यमंत्री विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झालं. कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, मुख्यमंत्र्यांसोबत अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परबही पत्रकार परिषदेत उपस्थित
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोरोनामुळे आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्यात आली होती. तीन लाख मर्यादा होती, अशातच 1 मार्चपासून आमदारांचं वेतन पूर्ववत होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या समितीची स्थापना राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या समितीची स्थापना, विधानसभा उपाध्यक्षांनी जाहीर केली समिती, वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती, चार महिन्यात अहवाल देण्याची मुदत