Amravati Crime News : अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Buero)  सापळा रचत धडक कारवाई केली आहे. अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच 18 हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या नायब तहसीलदाराला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 


खुर्चीत बसलेल्या नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ 
अचलपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना 18 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार श्रीराव यांनी रेतीचा एक ट्रक पकडला होता. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रांची माहिती आरटीओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला 20 हजार रुपयांची लाच मागितली होती..


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला सापळा 
चार दिवसापूर्वी श्रीराव यांनी रेतीचा ट्रक पकडला. हा ट्रक तहसील कार्यालय परिसरात उभा आहे. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रे-माहिती आरटीओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला 20 हजार रुपये लाच मागितली होती. दरम्यान संबंधिताने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.


गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू


अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या केबिनमध्येच 18 हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या श्रीराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात अमरावती घटकाने ही कारवाई केली.


दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या शिपाई आणि अधीक्षकांवरही कारवाई


दुसरीकडे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.. या घटनेमुळे आरोग्य विभागासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.  दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना पाच हजार रुपयांची लाच घेतानालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर डांगे यांनी शिपाई यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आज तक्रारदाराने शिपाई खोत याला 5 हजार दिले. तो शिपाई थेट तो पैसे घेऊन अधीक्षकांच्या केबिनमध्ये गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिपाईला आणि अधिक्षकाला कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Kolhapur Bribery Cases : कोल्हापूर जिल्हा लाचखोरांनी अक्षरश: पोखरला! खाकी वर्दी ते ग्रामपंचापत सदस्यांपर्यंत हात बरबटले, बांधलेल्या शौचालयातही कमिशनची 'लालसा' सुटेना