रणसंग्राम महापालिकांचा : दिवसभरात कुणाकुणाचे अर्ज बाद?
एबीपी माझा वेब टीम | 04 Feb 2017 08:59 PM (IST)
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर अनेकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुणे : रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी नाकारली सतीश बहिरट यांनाही उमेदवारी नाकारली उल्हासनगर : शिवसेनेला मोठा धक्का, माजी महापौर अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला टीम ओमी कलानीचा प्रमुख ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज बाद, तीन अपत्य असल्याच्या मुद्द्यावर उमेदवारी नाकारली, भाजपच्या अडचणी वाढल्या ठाणे : संजय घाडीगावकर यांचा निवडणूक अर्ज बाद ठरला. पूर्वी त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं आणि त्याला लाभ घेतलेले पैसे भरण्याचे आदेश होते. ते भरले नाही शिवाय सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी आहे, असा आक्षेप रवी पालव आणि प्रकाश शिंदे यांनी घेतला आणि अर्ज बाद झाला