महाजन कुटुंबीयांचा जमिनीचा वाद मिटला : प्रकाश महाजन
प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Continues below advertisement
औरंगाबाद : महाजन कुटुंबीयांचा जमिनीचा वाद कोर्टाबाहेरच मिटला असल्याची माहिती भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी दिली आहे.
महाजन कुटुंबीयांची उस्मानाबादेत वडिलोपार्जित संपत्ती आहे. त्या संपत्तीवरून प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. या जमिनीच्या वादावरून सारंगी महाजन यांनी महाजन कुटुंबावर आरोप केले होते. मात्र हा वाद मिटल्याची माहिती प्रकाश महाजन यांनी दिली.
सारंगी महाजन यांना हवा असलेला वाटा त्यांना दिला गेला आहे आणि त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेला दावा देखील मागे घेतला असल्याचं महाजन म्हणाले आहेत.
Continues below advertisement