नागपूर: दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना आणखी एक धक्का बसला आहे. गडचिरोली पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून, जानकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश द्या, अशी विनंती केली आहे.


महादेव जानकरांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशी होणार आहे. मात्र सध्या अधिवेशन सुरु असल्याने, पोलिसांनी थेट अध्यक्षांना पत्र लिहून, जानकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

हायकोर्टाकडूनही दिलासा नाही

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, या मागणीच्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या.
'खडसेंचा काटा काढला, मग जानकरांना का वाचवता'

यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.







संबंधित बातम्या :
निवडणूक आयोगाचे जानकरांवर कठोर शब्दात ताशेरे

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन महादेव जानकरांवर गुन्हा दाखल

दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल

जानकर थोडं मोठ्यानं बोलतात, पण बिचारे सज्जन आहेत:...

'खडसेंचा काटा काढला, मग जानकरांना का वाचवता'

विधीमंडळ : महादेव जानकरांबाबत कोण काय म्हणाले?