सातारा: महाबळेश्वर-पोलादपुर घाटातील रस्ता दरीत कोसळल्याने महाबळेश्वर-पोलादपुर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळी अद्याप प्रशासनाचा कोणताही अधिकाऱ्याने भेट दिलेली नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

विशेष म्हणजे, या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत. संततधार पावसामुळे संपूर्ण घाटाची दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष नाही आहे. या घाटातील रस्ता खचुन 1000 फूट दरीत कोसळल्याने मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

 

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूकही बंद केली आहे.