सातारा : पर्यटकांचं महाराष्ट्रातलं आवडतं पिकनिक स्पॉट असलेल्या महाबळेश्वरचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. वेण्णा लेक परिसरात दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच वेण्णा लेक भागात शून्य डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं. आजही पारा 2 अंशांवर गेला आहे. त्यामुळे झाडांवरचे दवबिंदू गोठल्याचं चित्र आहे. महाबळेश्वरमध्येही आजचं नीचांकी तापमान हे 5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे.

महाबळेश्वरात पारा खालावला, वेण्णा लेक भागात 0 अंश तापमान


हिवाळ्यात पर्यटकांचा ओढा महाबळेश्वरकडे असतो. तापमान खालावल्यामुळे पर्यटक गारठले आहेत, मात्र त्यातही त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.