Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा
Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: मुंबईत बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 01 May 2023 09:05 PM

पार्श्वभूमी
Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) मुंबईत (Mumbai News) वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ...More
Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) मुंबईत (Mumbai News) वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. तसेच, पोलिसांकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे. तिन्ही पक्षांकडून मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेच्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आला आहे. सोबतच तिन्ही पक्षाचे झेंडे देखील परिसरात लावण्यात आले आहेत. सभा स्थळी प्रत्येक खुर्चीवर पाण्याची एक बाटली ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय सभास्थळी सहा रुग्णवाहिकादेखील आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यभरात 16 सभा महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात पार पडली होती आणि आज मुंबईत सभा होणार आहे.
Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत; उद्धव ठाकरे यांची टीका
Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली