औरंगाबाद : गणपती विसर्जनासाठी औरंगाबाद पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून थोडी हटके तयारी केली आहे. गणपतीच्या मिरवणुकीवर कोणतही संकट ओढवू नये म्हणून पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीत काही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास वेळप्रसंगी समाजकंटकांवर ड्रोनमधून मिरची पावडरचा मारा करण्यात येणार आहे. तसेच उद्या गणपती विसर्जनासाठी औरंगाबाद पोलिसांनी 1 हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात ठेवला. त्यामुळे उद्या विशेष पोलीस अधिकारी ड्रोनद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवणार आहेत.

तर दुसरीकडे मुंबईतही गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे.