Lonavla News: लोणावळ्यातील एकवीरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आपली हुल्लडबाजी चांगलीच महागात पडली आहे. एकवीरा गडावर दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहोचली. त्यामुळे  मधमाश्यांनी भाविकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक जखमी झाले असून, गडावर एकच गोंधळ   उडाला होता.


रंगीत धुराच्या फटाक्यामुळे मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला


मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी गडावर पोहोचली होती. पालखीत सहभागी भाविकांनी मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके लावले. फटाक्यांच्या आवाजाने आणि धुरामुळे मंदिर परिसरातील मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का बसला. त्यामुळे संतप्त मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला.  यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले.


एकवीरा गडावर फटाका बंदी कायम ठेवण्याची मागणी


मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या  काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी स्थानिकांनी केलीये.


साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न


साईबाबा संस्थानने आज भक्तांना अनोखी भेट दिलीय. तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य साईभक्त जोडीला आजपासून साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभं राहण्याचा मान दिला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहील्याच दिवशी साईबाबा संस्थानने सामान्य साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे. दररोज होणा-या साई बाबांच्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे. साईबाबांची माध्यान्ह, धूप आणि शेज आरतीला भाग्यशाली जोडी सर्वात पुढे उभी असणार आहे. आरती सुरू होण्यापुर्वी सामान्य दर्शनरांग थांबवली जाते. यावेळी जी जोडी सर्वात पुढे असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंदह


तर, त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. नाताळातील सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज शिष्टाचारासंबंधित अतिमहत्त्वाचे व्यक्ती वगळता इतरांना व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. केंद्र स्तर, राज्य किंवा जिल्हाधिकारी प्रशासनाकडून लेखी पत्रव्यवहार करणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच व्हीआयपी दर्शन मिळणार आहे.