Lokmanya Tilak Award 2023 :  पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. 


त्यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर मोदी आणि भाजपविरोधी आघाडीतल्या दोन नेत्यांची म्हणजे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. कुठलाही पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी वाढते. मला मिळालेल्या पुरस्काराला लोकमान्य टिळकांचं नाव जुळलंय. त्यामुळं माझी जबाबदारी कैक पटीनं वाढलीय, असं सांगून पंतप्रधानांनी हा पुरस्कार 140 कोटी जनतेला समर्पित करत असल्याचं जाहीर केलं. या पुरस्कारातून मिळालेली एक लाखाची रक्कम आपण 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. छत्रपती शिवराय, फुले, टिळक, चाफेकर अशा महान नेत्यांची महाराष्ट्र ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत, या पुण्यनगरीत येण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, असे उद्गार त्यांनी काढले. 


1983 पासून पुरस्काराची सुरुवात...



दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार येतो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.



लोकमान्य टिळक पुरस्कारचे आतापर्यंतचे मानकरी


गोदावरी परुळेकर
इंदिरा गांधी (मरणोत्तर)
श्रीपाद अमृत डांगे
अच्युतराव पटवर्धन
खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)
सुधाताई जोशी
मधु लिमये
बाळासाहेब देवरस
पांडुरंगशास्त्री आठवले
शंकर दयाळ शर्मा
अटलबिहारी वाजपेयी
टी. एन. शेषन
डॉ. रा. ना. दांडेकर
डॉ. मनमोहन सिंग
डॉ. आर. चिदम्बरम
डॉ. विजय भटकर
राहुल बजाज
प्रा. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
रामोजी राव
एन. आर. नारायण मूर्ती
सॅम पित्रोदा
जी. माधवन नायर
डॉ. ए. सिवाथानू पिल्लई
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रणब मुखर्जी
शीला दीक्षित
डॉ. कोटा हरिनारायण
डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे
डॉ. ई. श्रीधरन
डॉ. अविनाश चंदेर
सुबय्या अरुणन
शरद पवार
आचार्य बाळकृष्ण
डॉ. के. सिवन
बाबा कल्याणी
सोनम वांगचूक
डॉ. सायरस पूनावाला 
डॉ. टेस्सी थॉमस


हेही वाचा-