Lok Sabha Election Reject Candidates : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.  ज्यात, महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा समावेश आहे. निवडणुकीतील (Election) खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवता येणार नाही. 


अवघ्या काही तासात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अनेकांनी कित्येक वर्षांपासून यासाठी तयारी केली आहे. मात्र, राज्यातील असे 18 लोकं आहेत, ज्यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने या 18 ही लोकांची यादीच जाहीर केली आहे.  


अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी...



  • मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ (Mumbai North-Central Assembly Constituency)

  • गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी (Jintur Assembly Constituency Parbhani) 

  • अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया (Amgaon Assembly Constituency Gondia) 

  • उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया ( Amgaon Assembly Constituency Gondia)

  • दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे (Ambernath Assembly Constituency Thane) 

  • नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) : सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे (Sindkheda Assembly Constituency Dhule) 

  • मुदसरुद्दीन अलिमुद्दीन : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड (Nanded South Assembly Constituency Nanded)

  • पांडुरंग टोलाबा वान्ने : लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड (Loha Assembly Constituency Nanded)

  • गोविंदा अंबर बोराळे : नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक (Nandgaon Assembly Constituency Nashik)

  • आव्हाड महेश झुंजार : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक  (Nashik East Assembly Constituency Nashik)

  • हबीबुर रहमान खान : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे (Bhiwandi East Assembly Constituency Thane)

  • महेंद्र राजेंद्र बोराडे : बीड विधानसभा मतदारसंघ बीड (Beed Vidhan Sabha Constituency Beed)

  • मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल : मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई (Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency Mumbai)

  • विशाल दत्ता शिंदे : किनवट  विधानसभा मतदारसंघ नांदेड (Kinwat Assembly Constituency Nanded)

  • इम्रान बशर : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड (Nanded North Assembly Constituency Nanded)

  • सुमीत पांडुरंग बारस्कर : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई (Chandivali Assembly Constituency Mumbai)

  • ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई (Chandivali Assembly Constituency Mumbai)

  • मोहम्मद इम्रान कुरेशी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई (Chandivali Assembly Constituency Mumbai)


इतर महत्वाच्या बातम्या : 


Lok Sabha Election 2024 Date LIVE : लोसकभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार; दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद