Mahayuti Sabha at Shivaji Park मुंबई : दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आज महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC Graound) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत. या दोन्ही सभांकडे राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सोबतच शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेच्या निमित्याने मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत महायुतीच्या प्रचारार्थ एकत्र दिसणार आहेत.
या सभेविषयी बोलतांना मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आजची सभा ही पर्वणी असून ही एक ऐतिहासिक सभा होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर आजची सभा ही लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शिव तीर्थावर ज्या सभा व्हायच्या, त्यांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे या सभेची आम्हाला अतिशय उत्सुकता असल्याचे देखील मनसे नेते आणि आमदार राजू पाटील म्हणाले.
आजची सभा बाळासाहेबांच्या सभांची आठवण करून देणारी
आज शिवतीर्थावर महायुतीची सभा आहे. या सभेला प्रामुख्याने नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत .या सभेबाबत महायुतीसह मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मोठी उत्सुकता लागली आहे. अल्पावधीतच या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आजची सभा ही आमच्यासाठी मोठी पर्वणी असल्याचे मत व्यक्त केलंय.
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा मतदाराला आपलंसं करण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यासाठीच शिवाजी पार्कची निवड करून ते थेट उद्धव ठाकरेंना शह देऊ इच्छितात, असं देखील बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या