सांगली : सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये 20 टक्के कर्मचाऱ्यांनिशी पंप बनवण्याच्या कामाला आज (25 एप्रिल) सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. किर्लोसकर समूहाला काल (24 एप्रिल) लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत उद्योग सुरु करण्याची परवानगी मिळाली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या पंप बनवण्याच्या कंपनीला आपला उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली गेली आहे.

किर्लोस्करवाडीमधील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये काल संपूर्ण परिसर, मशिनरी विभागात औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करण्यात आला. तसंच काही कर्मचाऱ्यांची सोशल डिस्टन्स पाळून राहण्या, खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. आज सकाळपासून खऱ्या अर्थाने 20 टक्के कर्मचाऱ्यांच्या बळावर किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये काम सुरु झालं आहे.

दरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. तर काही कर्मचाऱ्यांची खास बसने ने-आण केली जाणार आहे.

Lockdown | पश्चिम महाराष्ट्रात 27 उद्योग तर औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या पुन्हा सुरु

पश्चिम महाराष्ट्रातील कोणते प्रमुख उद्योग सुरु झाले आहेत पाहूया.

पुणे
वालचंद नगर -
* पेन्ना सिमेंट
* बल्लारपूर पेपर्स

सोलापूर
* अल्ट्रा टेक सिमेंट
* जुआरी सिमेंट
* बिर्ला सिमेंट|
* छट्टीनाड सिमेंट

कोल्हापूर
* इंडो काऊंट
* किर्लोस्कर ऑईल इंजिनिअर्स

सांगली
* किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड

सातारा
* कमिन्स उद्योग समूहाचे तीन प्रकल्प

Lockdown | पश्चिम महाराष्ट्रात 27 प्रमुख उद्योग पुन्हा सुरु, कामगारांच्या हाताला रोजगार