अहमदनगर : एकीकडे राज्यात आजपासून शाळा सुरू  झाल्यात मात्र अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये शाळांची घंटा वाजलीच नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 61 गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून ग्रामस्थांनी मात्र लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी केलीय.

Continues below advertisement

आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या असून व्यवसाय सुरळीत झाले आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 61 गावात अनेक निर्बंध घालण्यात आले असून आज पासून पुढील 10 दिवस लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. आजपासून जिल्ह्यातील 61 गावात कोरोना नियंत्रण करण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश यात असून जिल्ह्यातील 61 गावांचा समावेश करण्यात आलाय. आजपासून राज्यात ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंत शैक्षणिक काम सुरू झाले असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात शाळा बंद राहणार आहेत. शाळा उघडण्यासाठी 13 ऑक्टोबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

Continues below advertisement

एकीकडे राज्य अनलॉक होत असताना अहमदनगर जिल्ह्यात 61 गावात लॉकडाऊन लावण्यात आलाय. लॉकडाऊन बाबत व्यापारी वर्गात रोष तयार झाला असून लॉकडाऊनचे निकष लावताना लोकसंख्येचा विचार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. 

राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्यात तर  धार्मिक स्थळे लवकरच सूरु होणार असून अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिल्याने तिसरी लाट सूरु होण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याच दिसून येतंय.