Lockdown Live Update | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी कडक निर्बंध

मीरा - भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत  हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2021 07:31 AM

पार्श्वभूमी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू केलं आहे. राज्यात नागपूर, मीरा भाईंदर येथे लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर नाशिक, बुलडाणा,...More

बीड जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने/आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालय/मेडिकल वगळून) दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील 


बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, पानटपरी इ. ग्राहकांसाठी आजपासुन पुर्णत: बंद राहतील. केवळ पार्सल सुविधा सुरू राहतील. असे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम दि.18 मार्च 2021 पासुन पुढे अनिश्चीत काळासाठी बंद राहतील. जिल्ह्यातील फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करून फळ व भाजीपाला विक्री करावा. जिल्ह्यातील सर्व दुकाने/आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालय/मेडिकल वगळून) दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दिले आहेत.