आठवड्याभरात लोडशेडिंग बंद, ऊर्जामंत्री बावनकुळेंचं आश्वासन
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2017 11:46 AM (IST)
जलविद्युत केंद्रही सुरु झाल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे लवकरच भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.
नंदुरबार : भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणाऱ्यांना ऊर्जामंत्र्यांनी दिलासा दिला आहे. आणखी फक्त आठवडाभरच नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागेल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. कोळश्याची तूट भरुन काढण्यासाठी बाहेरुन कोळसा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात निर्णय झाला असून जलविद्युत केंद्रही सुरु झाल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे लवकरच भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. बावनकुळे नंदुरबारमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. गेल्या सहा दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.