LIVE UPDATES | कमलनाथ सरकारचा फैसला उद्या, मध्यप्रदेशमध्ये विश्वासदर्शक ठराव उद्याच आणण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2020 06:18 PM
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल्यांच्या मुकाबला करण्यासाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या 70 जवानांनी रक्तदान केलं. दक्षिण गडचिरोलीमध्ये सीआरपीएफच्या 9 बटालियनने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होत. 81 व्या सीआरपीएफ स्थापना दिवसच्या पाश्वभूमीवर 9 बटालियनचे कमांडन्ट रवींद्र भगत यांनी या शिबिराच उद्घाटन केले.
कमलनाथ सरकारचा फैसला उद्या, मध्यप्रदेशमध्ये विश्वासदर्शक ठराव उद्याच आणण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा कोर्टाचा आदेश
प्रीतीच झुळझुळ पाणी, कानाने बहिरा मुका परी नाही.. आदी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार मुरलीधर गोडे यांचं ठण्यात निधन. ते 88 वर्षाचे होते.
सांगलीतील हनुमाननगर भागात घरफोडी करून पळून जात असताना दोन दरोडेखोरांना मिरज तालुक्यातील इनाम धामणी गावच्या ग्रामस्थांनी अंकली येथून नदी पार करून पळून जाताना पकडले. संतप्त ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी चोरट्यांना झाडाला डांबून ठेवून मारहाण करत केले. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
हिंगोलीत वसमत तालुक्यातील बागल पार्डी येथील राहुल धर्माजी खिराडे यांच्या घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची प्राथमीक माहिती आहे. या स्फोटात घराला आग लागल्याने घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. तर घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी घटनास्थळी कुरूंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. हा स्फोट कशामुळे झाला हे कारण मात्र स्पष्ट आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहे.
अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना धामणगाव रेल्वे तर्फे पहिल्यांदा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलंय.
बीड : अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना एसीबी टीमने रंगेहाथ पकडले.
मुंबई, गुजरातला पाठविण्यात येत असलेल्या भाजीपाल्याला कोरोनाचा फटका. मागणी नसल्याने भाजीपाला विशेषतः मेथीची भाजी मनमाड बाजार समितीत पडून. शेतकरी आणि व्यापारी हवालदिल.
काल वाशिम जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार अवकाळी पावसा सह गारपिटीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच मोठं नुकसान झालं मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा गावातील शेतातगजानन सोपानराव पाकधने यांच्या 1 हेक्टर संत्रा बागेच मोठं नुकसान झालं तसेच संजय ज्ञानदेव चांभारे तऱ्हाळा यांच्या शेतातील 1 हेक्टर संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झालं असून रब्बी च्या हरभरा, गहू, आंबा पीकाचे नुकसान झालं आहे मात्र पंचनामा झाल्यावर आकडेवारी समोर येईल
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मोठा निर्णय. कोरोनाला रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात भूकंपाच्या धक्यांचे सत्र सुरूच. सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान तलासरी धुंदलवाडी वाणगाव भागात भूकंपाचा धक्का जाणवल्याची नागरिकांची माहिती.
कोरोनाला प्रतिबंधित करण्यासाठी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचे 20 मार्चपासून अत्यावश्यक सेवा सोडून बाजरपेठ बंद ठेवण्याचे आदेश.
कोल्हापूर : चालत्या कारला आग लागून त्यात एका महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. आंबोली घाटात हा अपघात झाला. तर, या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. एका कारला धडक दिल्यानंतर भरधाव वेगाने गाडी घेऊन जात होता. मात्र, त्याचवेळी त्याच्या कारला आग लागली. स्वतः उडी मारली, पण पत्नीने सिट बेल्ट लावल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही.
कोल्हापुरात गुजरी येथे गाडीवरून जाताना शिंकल्याने एकाला पती-पत्नीने चोपला. मास्क लावणार नसल्याचं सांगत अरेरावी केल्याने मारहाण.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाभिक एकता मंच संघटनेने नागपूर जिल्ह्यातील सलून दुकाने पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलून दुकानात दाढी, कटिंग बनविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. लोक एकत्रित बसतात, त्यावेळी संक्रमण होऊ नये म्हणून असे एकत्रीकरण टाळण्यासाठी काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोवा : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पहाटे दाबोळी विमानतळाला आरोग्य अधिकाऱ्यांसह भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांच्या तपासणीसाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे याची पाहणी केली. लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन ही पाहणी करण्यात आल्याचे राणे म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या टोलनाक्यांवर तपासणी होत आहे. कोगनोळी टोलनाक्यावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील प्रवाशांची तपासणी होणार आहे. कर्नाटक राज्य प्रशासनाकडून ही तपासणी करण्यात येत आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरही प्रवाशांची तपासणी होत आहे.
पुणे : राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल, पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ अन् धमकावल्याचा आरोप, अजित पवारांच्या आदेशाला हरताळ
हिंगोली-वसमत तालुक्यातील खाजनापूरवाडी पाटीजवळ कुरुंदा येथील आयशअर टँकर आणि हायतनगर येथील ट्रक्टरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले आहेत.
जुनी वडारवाडी येथे भीषण आगीची घटना. तीन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाच्या 15 फायरगाङ्या 3 वॉटर टँकरने आगीवर नियंत्रण. रात्री अडीच वाजताची घटना. 25-30 घरे जळाली.
सांगली : आजपासून जिल्ह्यातील पानपट्टया, तसेच मावा, तंबाखू विक्रीचे दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत पानपट्ट्या बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत.
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध हटवल्यानं बँकेच्या सर्व खातेदारांना दिलासा मिळणार आहे. सरकारने येस बँकेसाठी नवीन धोरण आखल्याने 13 दिवसानंतर बँकेवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. बँकेच्या सर्व सेवाही सुरळीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एटीएम, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या सुविधा पूर्वीप्रमाणे वापरता येणार आहेत. पाच मार्चला येस बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर बँकेच्या खातेदारांना 50 हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

पार्श्वभूमी

देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा... 

1. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आजपासून मुंबईतली 50 टक्के दुकानं बंद, बसमध्ये उभ्यानं प्रवास करता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचे अनेक महत्त्वाचे आदेश
2. दिवसभरात 4 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 वर, मुंबई, पुणे आणि पिंपरीमध्ये नवे रुग्ण, तर परदेशात 276 भारतीयांना कोरोना
3. कोरोनामुळं राज्यभरातली लग्नकार्य पुढे ढकलली, पुण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील सलून बंद, ऑनलाईन वीज भरण्याचं महावितरणचं आवाहन
4. . खासगी कंपन्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी आढळल्यास कलम 188 अतंर्गत कारवाई, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींची तंबी
5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दारुची दुकानं बंद, अनेक शहरात बार, पब्जचंही शटर डाऊन, तर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना 200 ऐवजी हजाराचा दंड
6. मुंबईत तब्बल 1 कोटीचं सॅनिटायझर जप्त, विनापरवाना ओमानला निर्यात करण्याचा डाव उधळला, नागपुरातही बनावट सॅनिटायझरच्या 1 हजार बाटल्या जप्त
7.कोरोगाव भीमाप्रकरणी शरद पवारांची 4 एप्रिलला साक्ष नोंदवणार, कोरोगाव भीमा चौकशी आयोगाकडून शरद पवारांना समन्स


एबीपी माझा वेब टीम 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.