LIVE UPDATES | जस्टिस भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Mar 2020 02:27 PM
जस्टिस भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती
नवी मुंबईत डी वाय पाटील कॉलेजमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये आग, शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागली, सुदैवाने आगीत जीवितहानी नाही
भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाकडून शरद पवारांना बोलावण्यात आले आहे. 4 एप्रिलला मुंबईत होणा-या सुनावणीत शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची चौकशी सुरु आहे.
बंगळुरुत हायहोल्टेज ड्रामा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह राजीनामा दिलेल्या आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरुत गेले असता त्यांना आमदारांना भेटण्यापासून रोखलं.
कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील तांदळा येथे अपघात झाला आहे. भरधाव वेगातील इंडिगो कार डिपीला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. ही घटना गेवराई तालुक्यातून गेलेल्या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील तांदळा येथील गवते वस्तीवर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ महामार्गावर बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून हा भीषण अपघात सिसिटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मंगळवारी (17 मार्च) सकाळची ही घटना असून या अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावरुन जाणाऱ्या काही बसेसवर दगडफेकही केली होती. शिरवाडे वणी गावचे संजय डंबाळे हे आपल्या बजाज डिस्कवर बाईकवर महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी वडाळी भोईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालेगाव आगाराच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या डंबाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. बसचालक प्रविण कचवे यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव पोलिस करत आहेत. दरम्यान सिसिटिव्हीचे हे दृष्य बघता महामार्ग ओलांडतांना प्रत्येकाने काळजी घेण्याचीही गरज आहे.

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील भवानी मंदिरासमोर वारंगाकडून नांदेडच्या दिशेने सोयाबीनची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटला आणि नंतर ट्रकच्या पुढील भागात अचानक आग लागली. गावकऱ्यांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रकच्या केबिनला लागलेली आग विझवली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

पार्श्वभूमी

1.Coronavirus | कोरोनाच्या महामारीत तुम्ही निवांत फिरताय? इटालियन नागरिकाचा हा भीषण अनुभव नक्की वाचा

2.Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर, हायकोर्टाकडून 15 हजारांचा दंड

3.Coronavirus | सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

4.Coronavirus | कोरोनामुळे डाळ उद्योगाला भरभराटीचे दिवस

5.Coronavirus | मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना 20 मार्चपर्यंत हॉस्टेल खाली करण्याचे आदेश

6.Coronavirus | मुंबईसह उपनगरांतील पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा, डान्सबार बंदीचे आदेश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.