Live Updates Uddhav Thackeray : कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? उद्धव यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhhav Thackeray in Mahad:  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडत आहे. महाडमध्ये दाखल होण्यापूर्वी उद्धव यांनी बारसू येथील ग्रामस्थांची भेट घेतली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2023 08:16 PM
Uddhav Thackeray: कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय...तुम्ही उपऱ्या लोकांसाठी लढताय; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र

Uddhav Thackeray:  कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय...तुम्ही उपऱ्या लोकांसाठी लढताय; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र

Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? उद्धव यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray:  कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? उद्धव यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray:  रायगडमधील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त गावातील पुनर्वसनाचे काम प्रशासनाने थांबवले; उद्धव यांचा आरोप

Uddhav Thackeray:  रायगडमधील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त गावातील पुनर्वसनाचे काम प्रशासनाने थांबवले; उद्धव यांचा आरोप

कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू: उद्धव यांचा इशारा

कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू: उद्धव यांचा इशारा 

Uddhav Thackeray: बारसूमध्ये सगळीकडे पोलीस...घरात पोलीस, गच्चीवर पोलीस... एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता; उद्धव ठाकरे

बारसूमध्ये सगळीकडे पोलीस...घरात पोलीस, गच्चीवर पोलीस...एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता...

Uddhav Thackeray: भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं गद्दारांना दिले; उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

Uddhav Thackeray:  - सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. 
- भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना दिले 
- माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही
- तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत...याचं आश्चर्य वाटत आहे. 

शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहे: उद्धव ठाकरे

शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरीदेखील मिळत नसेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

रायगडात तीन तीन गद्दार जन्माला आले, हा रायगडला लागलेला कलंक : अनंत गीते

Mahad Rally: रायगडात तीन तीन गद्दार जन्माला आले, हा रायगडला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढायचा आहे, त्यांना टकमक टोक दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार अनंत गीते यांनी दिला. महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार  असल्याची ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनंत गीते यांनी दिली. महाडमधील एकमुखाने सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवगर्जना सभा विराट होत असल्याचे ते म्हणाले. 

महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार : अनंत गीते 

महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार  असल्याची ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनंत गीते यांनी दिली. महाडमधील एकमुखाने सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवगर्जना सभा विराट होत असल्याचे ते म्हणाले. 

Mahad Rally: महाड सभास्थळी उद्धव ठाकरे यांचे आगमन

महाड सभास्थळी उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून रणकंदन सुरु आहे. बारसूमध्ये आंदोलन करत असलेल्या स्थानिकांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलगावमध्ये स्थानिक ग्रामस्थांची भेट घेत त्यांची मते जाणून घेतली. बळाचा वापर करणार असाल, तर रिफायनरीला आमचा कडाडून विरोध असेल, आम्ही स्थानिकांसोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. त्यांनी कातळशिल्पला भेट देत पाहणी केली.  जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Mahad Rally: लोकांच्या छातीवर बंदुका ठेवून आम्ही प्रकल्प आणू देणार नाही; सुभाष देसाईंचा इशारा 

Mahad Rally: आजची ही सभा सुद्धा ऐतिहासिक आहे संपूर्ण चित्र बदलून टाकेल अशी आजची सभा उद्धव साहेब ठाकरे घेत आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण परिवर्तन करायचं याच जिद्दीने पेटून उठलेले आहात. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पग्रस्तांशी बोलून त्यांना दिलासा दिला आहे. परंतु, लोकांच्या छातीवर बंदुका ठेवून आम्ही प्रकल्प आणू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिला. पर्यावरणाचा, निसर्गाचा सर्वनाश करण्याची मालिका शिवसेनेला मंजूर नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रकल्प आणला जातोय तर आपल्या बगलबच्च्यांना या विकासाचा फायदा मिळावा. म्हणूनच या जमिनींची खरेदी-विक्री व्यवहार परप्रांतीयांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिफायनरीची घोषणा झाली तेव्हापासून परप्रांतीयांनी केलेले सर्व जमीन खरेदीचे व्यवहार स्थगित करावे, तसा कायद्यात बदल करावा आणि महसूल कायद्यामध्ये बदल करून शक्य असल्याचे ते म्हणाले. 

Mahad Rally: बारसूत जमीन घेणारे सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय? सुषमा अंधारेंचा सवाल 

Mahad Rally: बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत ते सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय आणि या अमराठी नावांनी भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासीयांना हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल, तर आपली जबाबदारी असेल की कोकणवासीयांच्या सोबत ठामपणे उभे रहा व सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेत आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते. त्या प्रत्येकाला विश्वास दिला की बाबांनो तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. 

Mahad Rally: भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल 

महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची शिवगर्जना सभा होत आहे. या सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. एमाआयडीसीमधील भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी महाडवासियांना दिला. मडाड एमआयडीसीमधील यांची दादागिरी मोडून काढा असेही त्या म्हणाल्या. येत्या काळात स्नेहल जगताप महाडकरांच्या काळजात राहणारे नाव असेल, असेही त्यांनी सांगितले. 

पार्श्वभूमी

Uddhhav Thackeray in Mahad:  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरीवरून रणकंदन सुरु असतानाच आज (6 मे) दोन ठाकरे बंधू कोकण भूमीमध्ये आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाडमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज खेडमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत असून राज ठाकरे यांची खेडमध्ये सभा होत आहे. त्यामुळे या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनवरीवरून रणकंदन सुरु आहे. बारसूमध्ये आंदोलन करत असलेल्या स्थानिकांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलगावमध्ये स्थानिक ग्रामस्थांची भेट घेत त्यांची मते जाणून घेतली. बळाचा वापर करणार असाल, तर रिफायनरीला आमचा कडाडून विरोध असेल, आम्ही स्थानिकांसोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. त्यांनी कातळशिल्पला भेट देत पाहणी केली.  जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब


बारसूत भेट देऊन झाल्यानंतर त्यांची आज महाडमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेकडे सुद्धा लक्ष असेल.या सभेतून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. त्या आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत. महाडमधील राजकीय सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणावर बरसणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. वज्रमूठ सभांना स्थगिती मिळाल्याने या सभेमधून ते कोणावर प्रहार करतात याकडेही लक्ष असेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.