Coronavirus LIVE Update | कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2020 09:56 PM
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण, इस्लामपुरातील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या वडगावच्या एका महिलेला लागण
राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार, शरद पवारांचा पुढाकार
राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी
नवी मुंबई : कोरोनाग्रस्त महिला रुग्णाच्या मृत्यू बाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डी वाय पाटील रुग्णालयाला नोटीस, नवी मुंबई महापालिकेकडून नोटीस, महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली नाही, डी वाय पाटील रुग्णालयावर गुन्हा दाखल का करू नये, महापालिकेचा आक्रमक पवित्रा
कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत
मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह 5 ते 6 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबई : पनवेल मनपा उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याकडून जनजागृती करण्याच्या नादात नियमांचं उल्लंघन, मास्क न घालता , अंतर न ठेवता गाण्याचा अहट्टास, पाच लोकांच्या जागी सात जण एकमेकांना खेटून उभे, व्हिडीओ व्हायरल
ज्या कंपनीत कमाल 100 कर्मचारी आहेत अशाच कंपनीतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांचा पी एफ पुढील तीन महिने सरकार भरणार : अर्थमंत्री
देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार : अर्थमंत्री
जनधन योजनेतंर्गत महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने पाचशे रुपये टाकणार, उज्वला योजना अंतर्गत पुढील तीन महिने मोफत सिलेंडर देण्यात येणार, तर वयोवृद्ध, विधवा, अपंग व्यक्तींना पुढील तीन महिने एक हजार रुपये देण्यात येणार : अर्थमंत्री
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.
गरजूंच्या थेट खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार
असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे : अर्थमंत्री
निर्मला सीतारमण यांची 170000 कोटी पॅकेजची घोषणा केली आहे.
कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे.
देशातील प्रत्येक गरिबापर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार
आहे, असंही त्या बोलताना म्हणाल्या.
रेडिरेकनर दर 31मार्चला जाहीर होणार नाहीत. दर वर्षी मार्चअखेरीस सरकारकडून रेडीरेकनर दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या 15 दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर दर जाहीर करण्यात येतील.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 124 झाली, काल संध्याकाळी, मुंबई 1, ठाणे 1 असे 2 बाधित रुग्ण आढळले, यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
एपीएमसीमध्ये जीवनावश्यक वस्तू घेवून येणाऱ्या वाहनांचे होणार सॅनिटाझरींग. माथाडी कामगारांना मास्क. उद्यापासून भाजीपाला मार्केट सुरू होण्याची शक्यता.
कोरोनाचा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांना बसला आहे नाशिक जिल्ह्यात जवळपास 40 हजार एकरावर द्राक्षाची शेती केली जाते मात्र सर्व द्राक्ष आपल्या शेतामध्ये पडून आहेत. एकीकडे मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे पॅकेजिंगचे साहित्य नाही. व्यापारी शेतामध्ये येत नाही त्यामुळे माल विकला जाऊ शकत नाही. अशा पेचात नशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अडकला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. आता द्राक्ष हार्वेस्टिंग केली नाही तर याचा परिणाम पुढच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आणखी कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 5 वरून 7 वर, मौलवीचा मुलगा आणि मोलकरीण ही कोरोना पॉझिटिव्ह, दोघांना ही कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात येत आहे,
मौलवी काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते
महाराष्ट्रात कोरोनामुळे अजून एक बळी, वाशी येथील महिलेचा मृत्यू, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 124
रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल बंदी
,
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
,
ओळखपत्र दाखवल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही,
दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचा इशारा
पिंपरी चिंचवडमधील पहिल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आलाय. आज त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यासाठी नमुने पाठवले जातील. या तिन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं 11 मार्चला सिद्ध झालं होतं. हे तिन्ही रुग्ण पुण्यातुन डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्यासोबतच दुबईला गेले होते.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 124 वर, मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 1 नवीन रुग्ण
गोव्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रवास इतिहासाच्या आधारे त्यांची तपासणी करण्यात आली असता ते पॉझिटीव्ह आढळले, यामध्ये स्पेन (25 वर्षे), ऑस्ट्रेलिया (29वर्षे) आणि अमेरिका (55वर्षे) तीन वयोगटामधील पुरुषांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहर अजून ही शंभर टक्के लॉकडाऊन पाळताना दिसेना. पंतप्रधानांच्या आदेशाला धुडकावत काल पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा 73 जणांनी भंग केलाय. परवा असेच 86 गुन्हे दाखल झाले होते. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कलम 188नुसार दोन दिवसात एकूण 159 गुन्हे दाखल करण्यात आलेत.
पिंपरी चिंचवड शहर अजून ही शंभर टक्के लॉकडाऊन पाळताना दिसेना. पंतप्रधानांच्या आदेशाला धुडकावत काल पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा 73 जणांनी भंग केलाय. परवा असेच 86 गुन्हे दाखल झाले होते. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कलम 188नुसार दोन दिवसात एकूण 159 गुन्हे दाखल करण्यात आलेत.
Coronavirus LIVE Update | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टोल माफी, टोलमाफीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.


Curfew | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण



कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आलीय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 51
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.