CORONAVIRUS UPDATES | नवी मुंबईत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; न्युयॉर्कवरून आलेल्या तरुणाला लागण
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Mar 2020 10:27 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली तालुक्याच्या काही भागात वाऱ्यासह पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम. कोरोनाचे सावट असताना शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान.
सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज मध्यरात्रीपासून सोलापुरात सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल बंद, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच मिळणार पेट्रोल, डिझेल, सोलापूर शहर पोलीस संचलित एकच पेट्रोल पंप सुरू, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा
कोल्हापूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 437 मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल, कोल्हापूर शहरात 315 आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 122 जणांवर गुन्हे दाखल
कोरोना विषाणूवर औषध असल्याचा चिपळूणचे डॉक्टर शिवाची मानकर यांचा दावा. प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेला आव्हान, मला संधी द्या मी कोरोना पेशंटला बरा करतो.
शिर्डी : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्र्यांच्या कोरोना सहाय्यता निधीत जमा करणार
गोवा : 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या तारखा नियोजित वेळापत्रकाच्या किमान दहा दिवस आधी जाहीर केल्या जाणार आहेत.
ओडिशा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचे पुढचे चार महिन्यांचे वेतन सरकार आगाऊ देणार.
नवी मुंबई - पनवेलमध्ये कोरोनो पॉझीटीव्ह रूग्ण. न्युयॉर्कवरून आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण. त्याच्या घरातील सदस्यांनाही तपासणीस सुरुवात. सदर तरुणाला विमानतळावरून पनवेलमध्ये आणून सोडणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला पनवेल प्रशासनाने शोधून काढले. त्याचीही तपासणी कस्तूरबाला होणार आहे. पनवेलमध्ये हा दुसरा कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण सापडला आहे.
2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी. एक लाख 80 हजार कोटी रुपयांची तरतूद. ही सगळी रक्कम राज्यांना पुढच्या 3 महिन्यांसाठी आगाऊ देणार. लॉक डाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी पाऊल.
पुण्यातील भीमाशंकर परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. ही बाब कोरोनासाठी अनुकूल ठरण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जातीये
कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी जगात मोठी तयार केली आहे. घरात बसून राहणे, हाच आपल्याकडे मोठा पर्याय आहे.
लोकडाऊनच्या परिस्थिती काशी देशाला संयम, सहकार्य, शांती शिकवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात तुरळक पाऊस, पाऊस कमी, वाऱ्याचं प्रमाण जास्त.
महाराष्ट्रातील पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्याची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्यांना आज पुण्यातील नायडू रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्याची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्यांना आज पुण्यातील नायडू रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
#CoronaEffect कोरोना व्हायरसच्या संकटात अशी सुरु आहे केंद्रीय कॅबिनेटची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्र्यांकडून सुरक्षित अंतर ठेऊन बैठकीला हजेरी
#CoronavirusOutbreakindia
कोरोना महामारीचं गुढीपाडव्यावर सावट, सराफ व्यावसायिकांची तब्बल 200 कोटींची उलाढाल ठप्प
कोरोना महामारीचं गुढीपाडव्यावर सावट, सराफ व्यावसायिकांची तब्बल 200 कोटींची उलाढाल ठप्प
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली सुरक्षाव्यवस्था सोडली, महाराष्ट्रात पोलिसांवरचा ताण लक्षात घेऊन गडाख यांनी सोडली सुरक्षा व्यवस्था
दूध अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे लोकांना तुटवडा नको म्हणून आम्ही दूध सुरू ठेवत आहोत. मात्र दूध गोळा करताना गावकरी आणि स्थानिक पुढारी यांच्याकडून मदत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी दुधाचं काय करणार असा प्रश्न आहे. दुधाची गाडी घेऊन जाताना पोलिसांकडून ड्रायव्हरला मारहाण होत आहे. हे सर्व थांबलं तर आम्ही पुढे दूध पाठवू शकतो, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघाचे सचिव प्रकाश कुटवळ यांची माहिती
#coronaUpdate राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 112 वर, सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत. होळीच्या दिवशी कोरोनाग्रस्त म्हणून ते पुण्यातील नायडू रूग्णालयात दाखल झाले होते. आज गुढीपाडव्याच्या दिवशी ते अगदी ठणठणीत होऊन आपल्या घरी परतणार आहेत. त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पॉझिटीव्ह राहिलेल्या दोघांची पहिली टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. तसेच या दाम्पत्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. तिचे पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
मुंबईत कोरोनाचा चौथा बळी
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
कोरोनानंतर आता चीनमध्ये हंता व्हायरस
करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. ‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
21 दिवसांसाठी लॉकडाऊन
'करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा
सरकारी रुग्णालयांमध्ये मास्कचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून रुग्णालयातील वस्तूंचा तुटवडा आणि डॉक्टरांच्या समस्यांबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, पीपीई किट्स आणि उपलब्ध नसलेल्या मास्क याबद्दल सांगण्यात आले आहे. दरम्यान, जे डॉक्टर्स कस्तुरबा रुग्णालयात आणि विमानतळावर कार्यरत होते. त्यापैकी काही डॉक्टर हे करोना संशयित आहेत. त्यामुळे त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.