CORONAVIRUS UPDATES | व्हाट्सग्रुपद्वारे कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Mar 2020 10:56 PM
व्हाट्सग्रुपद्वारे कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माल वाहतूक ट्रक, टेम्पो संघटनेसोबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक. प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनांना स्टिकर दिले जाणार आहेत. मजूरांना आय कार्ड व घरांपर्यंत सोडण्याची वाहतूक व्यवस्थेवरही स्टिकर गरजेचं. वाहतुक विभागानं या संघटनांना मदत करावी. परिवहन खात्याचा निर्णय.
आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुसऱ्यांदा जनतेला संबोधन...
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107; मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक पॉजिटिव्ह
गावाकडं आलेल्या लोकांमध्ये काही लक्षण आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं. पण गावात येऊन देणार नाही, ही भूमिका हे राज्याला शोभणारी नाही.
नागरिकांनी गर्दी करू नये. शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा : आरोग्यमंत्री राजेश टोपे
हजारपेक्षा जास्त रुग्णालयं कोरोना विरोधात लढण्यासाठी सज्ज : आरोग्यमंत्री राजेश टोपे
एकीकडे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच दूसरीकडी मात्र रुग्णांची टेस्ट करण्यासाठीच्या लँब कमी पडत असल्याचं सत्य काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यापार्श्वभूमीवर आता सरकारच्या वतीने ही टेस्ट खाजगी लॅबला देखील करण्याची परवानगी दिली आहे. शासनाने 'मेट्रोपोलिस' आणि 'थायरो केअर' या खाजगी लॅबना टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 4 हजार 500 इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब ही आहे की, या लॅबचे कर्मचारी डॉक्टरांनी टेस्ट करण्याची गरज सांगितलेल्या रुग्णांचीच टेस्ट करणार आहेत. हे कर्मचारी संबंधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचे सँपल घेणार आहेत. त्यानंतर त्याचे रिपोर्ट 48 तासात देण्यात येणार आहेत. सध्या मेट्रोपोलीसच्या 400 ते 500 शाखा महाराष्ट्रात आहेत. लॅबच्यावतीने यासाठी काही कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात महानगरपालिकेने निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या 4 वाहनाद्वारे वर्दळीचे चौक, पानटपऱ्या, बाजारपेठेतील बंद दुकानाचे शटर इत्यादी ठिकाणी हे औषध टाकून निर्जंतुकीकरण केले जात आहे. आजपासून पुढचे 4 दिवस ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन अशाच प्रकारे महापालिकेचे स्वछता अधिकारी, कर्मचारी निर्जंतुकिरण करत नागरिकांना कोरोना बाबत काळजी घेण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती यावेळी स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबईत कोरोना व्हायरसचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार, रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधणार
कोरोना संशयित रुग्णाचं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल मधून पलायन केलं आहे. दुबईवरून आलेल्या 28 वर्षीय संशयित रूग्ण पळून गेल्यामुळे पोलिसांची त्याला शोधण्यासाठी धावाधाव सुरू आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार, एकूण रुग्णांची संख्या 101 वर
कोरोना संशयित रुग्णाचं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधून पलायन, दुबईवरून आलेल्या 28 वर्षीय संशयित रुग्णाचे पलायन, रुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांची धावाधाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहन चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. तसेच परभणीत एकूण 74 कोरोना संशयित आहेत. त्यातील 59 जणांवर घरीच तर 15 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साताऱ्यात राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संबधित 45 वर्षाची महिला ही सातारा जिल्ह्यात राहणारी असून ती दुबई येथून मुंबईत आली होती. मुंबईतून ती रात्री सातारला येत असताना तिला रस्त्यातच त्रास होऊ लागल्यामुळे ती साताऱ्यातील खंडाळा ग्रामीण रुग्णालयात स्वताहून गेली. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात रात्री 11 वाजून 50 मिनीटानी दाखल करण्यात आले होते. तिचे रिपोट काही वेळापुर्वी जिल्हा रुग्णालयात आले असून ही महिला कोविड19 बाधित असल्याचे समोर आले आहे. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात व्हेंटिलेटर आणि मास्कचा तुटवडा भासत असताना या गोष्टी 19 मार्च पर्यंत निर्यात होत राहणं हा गुन्हेगारी कटच आहे अशा कडक शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


 


पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह


 


पुण्यातील पहिल्या दोन पॉझिटीव रुग्णांची चौदा दिवसानंतर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. नऊ मार्चला हे दोघे पती पत्नी पॉझिटीव्ह ठरले होते. महाराष्ट्रात समोर आलेले कोरोना पॉझिटीव्ह ठरलेले हे पहिले रुग्ण होते. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सोबतच ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले होते. त्या कॅबचा चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे सामोरे आले होते. दरम्यान, आता या दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर, मुलगी आणि कॅब चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.


 


देशभरात आतापर्यंत 24 जण ठणठणीत


 


कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत असून आता खेड्यापाड्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता चारशेहून अधिक झाला आहे. तर, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यासह देशभरात सध्या लॉकडाऊन केलं आहे. यामुळे देशात एकप्रकारचे भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच ही पॉझिटिव्ह बातमी आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात याअगोदर औरंगाबादमधील प्राध्यापिका कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे सराकारकडून सांगण्यात आले आहे.


 


सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण


 


सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकत्याच प्रवास करून परतले होते.   त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, या चारही प्रवाशांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. तसेच या चारही कोरोना बाधित रुग्णांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.