Koregaon Bhima Live Updates : विजय स्तंभ परिसर विकासासाठी 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Koregaon Bhima :  शौर्य दिनानिमित्त (Shaurya Din) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे

abp majha web team Last Updated: 01 Jan 2023 01:40 PM
शौर्य दिनानिमित्त आज वाशिम शहरामध्ये मोटारसायकल रॅलीचे आयोजन

Washin News : 205 व्या शौर्य दिनानिमित्त आज वाशिम शहरामध्ये मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नालंदानगरमधून ही रॅली काढण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी

जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली असून आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः  परिसराला भेट देऊन या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला

पेरणे येथे सकाळपासून जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

मी धमक्यांना घाबरत नाही, पण..... वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजय स्तंभास घरुनच अभिवादन केले.  कोरेगाव भीमा या ठिकाणी येऊन विजय स्तंभास अभिवादन करण्याची आपली इच्छा होती. परंतू, काहींनी पुन्हा शाई फेक करण्याची धमकी दिली आहे. मी या धमक्यांना घाबरत नाही. परंतु अशा घटनेतून दंगल घडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची काहींची सुप्त इच्छा आहे. त्याचा त्रास विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना होऊ नये यासाठी आपण घरुनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विजय स्तंभास अभिवादन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

विजय स्तंभ परिसर विकासासाठी 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केलं.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी घरुनच अभिवादन केलं. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 


 


 

विजयस्तंभासाठी घोषीत केलेल्या100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार; चंद्रकांत पाटील

कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केलं.विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं, 

प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभास केलं अभिवादन
Prakash Ambedkar : शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरोगाव भीमा इथं हजेरी लावून विजय स्तंभास अभिवादन केलं. 
Koregaon Bhima: विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी, सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार

Koregaon Bhima: विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली आहे. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. 

विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी

Bhima Koregaon : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे.  या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

पार्श्वभूमी

Koregaon Bhima Live Updates :  शौर्य दिनानिमित्त (Shaurya Din) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.


कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.