Live Blog Updates: ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते पैसे वाटताय; यावर निवडणूक आयोगाने विचार करावा : शरद पवार

Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 15 Nov 2025 01:14 PM

पार्श्वभूमी

Live Blog Updates: जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. दिल्ली...More

सांगली मधील उत्तम मोहिते यांच्या हत्येतील आरोपींची सांगली पोलिसांनी काढली धिंड

सांगली मधील 4 दिवसापूर्वी झालेल्या उत्तम मोहिते यांच्या हत्येतील आरोपींची सांगली पोलिसांनी काढली धिंड


सांगली शहरातील गारपीर चौक ते इंदिरानगर या मार्गावर  आरोपींची  पोलिसांनी काढली धिंड


वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर गुन्हेगारांचे फॉरेन्सिक ऑडिट करून  गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडून काढण्याचा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता इशारा


पालकमंत्र्याच्या कालच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची आजची आरोपीची काढलेली धिंड महत्वाची


दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष असलेले उत्तम मोहिते यांची 4 दिवसांपूर्वी घरात घुसून झाली होती हत्या


चार आरोपींची सांगली पोलिसांनी काढली धिंड, या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन 


वाढदिवस कार्यक्रम संपल्या संपल्यानंतर घरात घुसून उत्तम मोहिते यांची झाली होती हत्या

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.