LIVE BLOG : आज दिवसभरात... 10 नोव्हेंबर 2019

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Nov 2019 05:30 PM

पार्श्वभूमी

१. शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरेंचा मालाडच्या हॉटेलात मुक्काम, काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेतेही जयपूरला आमदारांच्या भेटीला, राजकीय घडामोड़ींना वेग२. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं भाजपला निमंत्रणाचं पत्र, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय, भाजप अपयशी...More

पालघर-
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथील कोटुंबी ओहळावर शनिवार टँकर पलटी झाल्याने मोठे पांढऱ्या रंगाच्या फेसाचे 15 ते 20 फूट डोंगर तयार झाल्याचं पाहायला मिळालं,.,नेमक कुठलं केमिकल आहे याबाबत अधिकृत नाहीती नाही. मात्र स्थानिक आणि प्रवाश्यांनि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली.तर या मूळ अनेक मासे जीव जंतू मृत पावले असून स्थानिकांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे.. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून याबाबत कुठलीच माहिती स्थानिकांना दिली गेली नाही