शेतकरी कर्जमाफी दोन टप्प्यात होणार : सूत्र
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Dec 2019 09:41 PM
शेतकरी कर्जमाफी दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा एक आर्थिक वर्ष संपायच्या आत मार्च 2020 च्या आधी आणि दुसरा टप्पा एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यातही सरकारने एक टीम नियुक्त केली. बँकांकडून सरकारने शेतकरी कर्जमाफी बाबत मागवली माहिती मागवली असून हे पथक नियमित आढावा घेत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार जानेवारीत करा, अजित पवार यांची मागणी
घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय जवळ असलेल्या श्रीजी टॉवर या तेरा मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे घरातील साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच पाच अग्निशामक गाड्या, स्वयंचलित शिडी घटनास्थळी दाखल झाले. परंतु अतिउत्साही लोकप्रतिनिधीनमुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत होते.तर इमारतीची अग्निशमन यंत्रणा हि काम करीत नसल्याचे समोर आले . मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तर 15 महिला आणि पाच पुरुष यांना अग्निशमन डाळ आणि पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले.
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात; राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटून करणार चर्चा - सुत्र
यावर्षी साखरेची उच्चांकी निर्यात; 50 लाख टनांचं उदिष्ट गाठण्याची शक्यता
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला पंचवीस हजारांच्या दोन जामिनावर सुटका करण्यात आली.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला पंचवीस हजारांच्या दोन जामिनावर सुटका करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेचे दोन अभियंते आणि एक एसआय निलंबित झाले आहेत. मनोहर सोनावणे, सुजीत पारवे आणि अरुण पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कार्यशाळेला गैरहजर राहिल्याने मनोहर सोनावणे यांच्यावर कारवाई झाली. तर उर्वरित दोघांनी कामात निष्काळजीपणा केल्याने निलंबित करण्यात आलं आहे.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पावरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली. हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 जुलैपासून प्रकल्पाला स्थगिती होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं.
पंढरपूर : वीज चोरी पकडायला गेलेल्या वायरमन आणि हेल्परला कोयता, काठ्यांनी बेदम मारहाण, पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना, हेल्पर नरसिंह लांडे गंभीर जखमी
पंढरपूर : वीज चोरी पकडायला गेलेल्या वायरमन आणि हेल्परला कोयता, काठ्यांनी बेदम मारहाण, पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना, हेल्पर नरसिंह लांडे गंभीर जखमी
देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेनंतर आता भाजपचं नवं बॅनर चर्चेत आहे. नागपुरात विधानभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक बस स्टॉपवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर लागले आहे. 'आमचा तुमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार... पुन्हा येणार...'असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. भाजपच्या नागपूरच्या नेत्यांच्या फोटोसह लागलेले हे बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नंदुरबार : सारंगखेडा घोडे बाजारात पाच दिवसात 2 कोटींचा टप्पा पार, पाच दिवसात विक्रमी 485 घोड्याची विक्री, त्यातून 2 कोटी 20 लाख रुपयांची उलाढाल
नंदुरबार : सारंगखेडा घोडे बाजारात पाच दिवसात 2 कोटींचा टप्पा पार, पाच दिवसात विक्रमी 485 घोड्याची विक्री, त्यातून 2 कोटी 20 लाख रुपयांची उलाढाल
शवविच्छेदन खोलीतील मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाल्याची घटना बीडमध्ये घटली आहे. बीड शहरातील पंचशीलनगरमध्ये राहणार्या निकीता शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयातील पी एम रुममध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी मयत महिलेच्या गळ्यात आणि कानात सोन्याचे दागिने होते. त्यानंतर एका इसमाचा मृतदेह शवविच्छदनासाठी आणला आणि पी एम रुममध्ये ठेवला. यानंतर मयत महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलिस पी एम रुममध्ये गेले असता, तिच्या कानातील सोन्याचे फूल गायब असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. पी एम रुममध्ये ठेवताना मयत महिलेच्या कानात सोन्याचे फूल होते. मात्र पंचनामा करताना ते गहाळ झाले. या दरम्यान पी एम रुम देखील बंद होती. त्यामुळे ही चोरी कोणी केली असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत आई-मुलीवर सामूहिक बलात्कार, 26 ऑक्टोबरची घटना, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दहा जणांवर गुन्हा दाखल, सर्व आरोपी फरार
रणवीर सिंहचा 'गली बॉय' चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर, परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावं जाहीर, अंतिम 10 चित्रपटांच्या यादीत 'गली बॉय'चा समावेश नाही
अमूल, मदर डेअरीनंतर महानंदच्या दुधाचा दरही वाढणार, महानंद दुधाची किंमत दोन रुपयांनी वाढणार
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. जामिया विद्यापीठातल्या कारवाईविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनप्रक्षोभ, प्रियंका गांधींचा ठिय्या, ममत बॅनर्जींचा लाँग मार्च, मुंबईसह देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलनं
2. नागपुरातल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीचे संकेत, युती तुटली तरी धर्मांतर केलं नसल्याचं म्हणत भाजपलाही चिमटे
3. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, आक्रमक भाजपची घोषणाबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणे
4. शिवस्मारकाच्या कामात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर निविदेची किंमत कमी करुनही घोटाळा कसा? चंद्रकांतदादांचा प्रतिसवाल
5. उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी, आज शिक्षा सुनावण्याची शक्यता, उशीरा आरोपपत्र दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारलं
6. लष्करप्रमुख पदी मराठमोळ्या मनोज नरवणेंची नियुक्ती होणार, पीटीआयच्या हवाल्याचं वृत्त, 1 जानेवारीपासून नरवणे पदभार स्वीकारण्याची शक्यता