महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
16 Dec 2019 10:47 PM
नव्या वर्षात ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही वचनबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोंढव्यात इमारातीला भीषण आग लागली असून अग्नीशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल. इमारतीतील पाचव्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये आग लागली आहे. 5 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
आधीच्या सरकारसारखं वागायचं नाही; कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना आता जिल्हास्तरावर केली जाणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा आढावा बैठकीत घेतला निर्णय.
उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी; दिल्लीतल्या तीस हजार कोर्टाचा निर्णय
भाजपनं सुरु केलेली चार प्रभाग आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारच्या हालचाली - सुत्र
डोंबिवली : गर्दीमुळे तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू, डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळची घटना, चार्मी पासद (22 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव
नाशिक : डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प, नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा, पहाटेपासून बसफेरी सुरु झाल्याच नाही
Protest against CAA : पंतप्रधान मोदींचं शांततेचं आव्हान :-
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल ट्वीट करुन लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मोदींनी ट्वीट करुन म्हटले आहे की, ही शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधुभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. काल (15 डिसेंबर) नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात हिंसक आंदोलन झाले. सुप्रीम कोर्टाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही, असे मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आज हिंसाचार थांबला तर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
शिवसेनेची 10 रुपयांची थाळी जरी अजून सुरु झाली नसली तरी नागपूर पोलिसांनी बंदोबस्तासाठी आलेल्या हजारो पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 10 रुपयांची खास थाळी सुरु केली आहे. चपाती, भाजी, भात आणि मिठाई, सलाड असं या थाळीचे स्वरुप आहे. नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना विधानभवनाच्या अवतीभवती पाच ठिकाणी खास स्टॉल लावले आहेत. दररोज सहा हजार पोलिस कर्मचाऱ्यांना ड्यूटी पॉईंटवरच गरम जेवण उपलब्ध करुन दिलं जात आहे. ड्यूटी पॉईंटवर वेळेत जेवण मिळत असल्याने महत्त्वाची सेवा उपलब्ध झाल्याची भावना पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राजकारण्यांच्या थाळी आधीच पोलिसांची थाळी सुरु झाल्याचे चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे.
पुणे ते सातारा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण न झाल्यास खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे. 2010 साली सुरू झालेलं या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नागपूर खंडपीठात सिंचन घोटाळ्यासंदर्भातली सुनावणी 15 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली, एसीबीच्या नागपूर आणि अमरावती विभागातील अधीक्षकांनी न्यायालयात सादर केलेल्या 27 नोव्हेंबरच्या प्रतिज्ञापत्रानंतर आज सुनावणी होणार होती, दोन्ही प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना जवळपास क्लीन चिट
पुणे : मावळ तालुक्यातील आंबी गावाजवळील इंद्रायणी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळला, जीवितहानी नाही, प्रशासनाने पूल धोकादायक झाल्याचं आधीच जाहीर केल्याची माहिती, तळेगाव दाभाडे ते आंबी जोडणारा पूल
पुण्याच्या मावळ तालुक्यातील ब्रिटिश पूल आज पहाटे कोसळला. इंद्रायणी नदीवरील हा पूल तळेगाव ते आंबी या दोन गावांना जोडणारा होता. सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शंभर वर्षाहून अधिकचे पावसाळे खाल्लेला हा पूल धोकादायक असल्याचं प्रशासनाने आधीच जाहीर केलेलं होतं, तसेच पर्यायी मार्गाची ही व्यवस्था करुन ठेवलेली होती. पण पर्यायी मार्गाला थोडा अधिकचा वळसा घालावा लागतो, म्हणून ग्रामस्थ आणि कामगारवर्ग याच पुलावरून वाहतूक करत होते. अगदी काल रात्रभर देखील या पुलावरुन वाहतूक सुरु होती. पहाटे सहा वाजता हा पूल कोसळला तेव्हा कोणीच वाहतूक करत नव्हतं हे सुदैव म्हणावे लागेल. आता प्रशासनाने दोन्ही बाजूंनी हा मार्ग बंद करुन पूल पडल्याच्या सूचना फलक ही लावले आहेत.

बलात्कारप्रकरणी आंध्र प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

बलात्कार प्रकरणी आंध्रप्रदेश पॅर्टन राबवण्यासाठी महाराष्ट्रात जोरदार हालचाली सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत पत्र देऊन मागणी केली होती.
मुंबईत राहत्या घरात गांजा तयार केल्याचा प्रकार, आरोपीसह सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक किलो गांजा, 54 ग्रॅम एमडी ड्रग हस्तगत
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रविण दरेकरांची नियुक्ती, थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होणार, सुजितसिंग ठाकूरांना मागे टाकत दरेकरांची बाजी
स्मृती इराणींच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर राहुल गांधींचं स्पष्टीकरण मागवलं
शिवस्मारकाच्या कामात अनियमितता नाही, शिवस्मारकाचं 100 कोटींचं काम झालं आहे, स्मारकाचं काम लवकरच झाल पाहिजे- चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार, समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना नारळ देण्याच्या तयारी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार, समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना नारळ देण्याच्या तयारी
महाविकासआघाडी सरकारचं आजपासून पहिलं अधिवेशन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत
पार्श्वभूमी
राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. महाविकासआघाडी सरकारचं आजपासून पहिलं अधिवेशन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत
2. सत्तेसाठी शिवसेना किती लाचार होणार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा सवाल, तर भाजपनेच सावरकरांच्या तत्वांशी द्रोह केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी, भाजप हिंसा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
4. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता, 31 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल जारी करण्यात येणार असल्याची माहिती
5. पीएमसी खातेधारकांच्या आक्रोशाची अखेर मातोश्रीकडून दखल, अधिवेशनानंतर मुख्यमंत्री खातेदारांना भेटणार, घोटाळ्याबाबत माहिती देण्याची अधिकाऱ्यांना सूचना